KBC 11 मध्ये विचारला तनुश्री दत्तासंबंधी प्रश्न, बिग बी म्हणाले...

KBC 11 मध्ये विचारला तनुश्री दत्तासंबंधी प्रश्न, बिग बी म्हणाले...

बॉलिवूडमध्ये Me Too चळवळ सुरू असताना अमिताभ यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' सध्या टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये आहे. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत 3 स्पर्धक करोडपती होण्यात यशस्वी ठरले. पण त्याहून हा शो चर्चेत राहिला ते त्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळे. नुकताच या शोमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. ज्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी तनुश्री दत्ताला बहादूर म्हटलं आणि विशेष म्हणजे याबद्दल तनुश्रीनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय होता प्रश्न

हा आवाज कोणत्या ब्यूटी क्वीन आणि अभिनेत्रीचा आहे जिनं भारतात सर्वात आधी मीटू चळवळीत आवाज उठवला? या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये तनुश्री दत्ता, टीना दत्ता, कंगना रणौत आणि मंदाना करीमी यांची नावं देण्यात आली होती.

पॉप सिंगर लेडी गागानं ट्वीट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर खळबळ!

स्पर्धकानं या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणून तनुश्री दत्ताचं नाव घेतलं. त्यानंतर या प्रश्नाविषयी अतिरिक्त माहिती देताना अमिताभ बच्चन म्हणाले, तनुश्री दत्तानं फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ती ब्यूटी क्वीन असण्यासोबत अभिनेत्री सुद्धा आहे. बिग बी यांचं बोलण ऐकल्यावर स्पर्धकानं म्हटलं ती खूप धाडसी सुद्धा आहे. त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले. हो खूप खूप धाडसी. याबाबत स्पॉटबॉय-ईशी बोलताना तनुश्री म्हणाली, 'हे खूप कुल आहे. मी तुमची आभारी आहे.'

'कबीर सिंह' मागे टाकत 'या' चित्रपटाने 2019मध्ये जमवला सर्वात जास्त गल्ला!

तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर लावले होते आरोप

तनुश्री दत्तानं एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विरोधात आवाज उठवला होता. तनुश्री दत्तानं नानांवर 2008मध्ये आलेला सिनेमा ‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटिंग दरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. तनुश्री म्हणाली, नाना जबरदस्तीनं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. शूटिंग दरम्यानं ते या गाण्याचा भाग नसतानाही त्यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अनेक आरोप प्रत्यारोपांमध्ये घेरले गेल्यानंतर नानांना हाउसफुल 4 च्या शूटिंगमधून बाहेर पडावं लागलं. मात्र काही दिवसांपूर्वीच सबळ पुराव्यांअभावी पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिन चीट दिली आहे.

अवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट

=========================================================

लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading