नानांविरोधात तनुश्रीची तक्रार पोलिसांत दाखल, ४ तास चालली जबाब नोदवण्याची प्रक्रिया

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2018 12:05 AM IST

नानांविरोधात तनुश्रीची तक्रार पोलिसांत दाखल, ४ तास चालली जबाब नोदवण्याची प्रक्रिया

मुंबई, 10 आॅक्टोबर : अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलीये. तनुश्रीचा जबाब नोंदवून घेण्यात आलाय. तब्बल चार तासही जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे तनुश्री पोलीस स्टेशनमध्ये बुरखा घालून पोहोचली होती.

तनुश्रीसोबत तिचे वकील नितीन सातपुते सोबत आहे. दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे धाव घेतली होती. तनुश्रीने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केलीये. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केलीये.

महिला आयोगाने मंगळवारी तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेतली होती.. महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावत १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. तसंच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्रीविरोधातही अदखलपात्र गुन्हा दाखल

Loading...

तनुश्री दत्ताच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. बीड येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात पोलिसांत धाव घेतली. केज पोलीस स्टेशनमध्ये तनुश्रीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तनुश्रीने आरोप करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेची बदनामी केल्याने अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचंही धस यांनी सांगितलं.

दरम्यान, नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवलीय. या नोटिसीत तनुश्रीनं नानावर केलेले आरोप खोटे आहेत आणि तिनं नानांची क्षमा मागावी असं म्हटलंय.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...