बहुचर्चित TANHAJI सिनेमावर वादाचं सावट, ट्विटरवर जितेंद्र आव्हाडांनी दिली धमकी

बहुचर्चित TANHAJI सिनेमावर वादाचं सावट, ट्विटरवर जितेंद्र आव्हाडांनी दिली धमकी

तानाजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांची सत्ता उलथवून लावत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या स्वराज्य स्थापनेमध्ये मावळ्यांनी जीवाची बाजी लावली. पुरंदरच्या तहात गमवावा लागलेला कोंढाणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंनी प्राणांची आहुती दिली. मुलाचे लग्न असताना आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं असं म्हणत ते मोहिमेवर गेले. याच तानाजी मालुसरेंच्या शौर्यगाथेवर आधारीत TANHAJI हा हिंदी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. पण हा ट्रेलर रिलीजनंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

तानाजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल.’

सलमानच्या वडीलांशी लग्न करुनही हेलन कधीही होऊ शकल्या नाही ‘आई’

जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटनंतर NCP ठाणे यांनीही एक ट्वीट केलं आहे. ज्यात जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यात जितेंद्र आव्हाड या सिनेमाच्या ट्रेलरविषयी बोलताना दिसत आहेत. दरम्यान या ट्वीटला सिनेमाच्या दिग्दर्शनकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जितेंद्र आव्हाडांच्या अगोदर संभाजी ब्रिगेडनंही या सिनेमातील काही आक्षेपार्ह दृश्यांबद्दल सिनेमाच्या निर्मात्यांकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यामुळे एकंदरच संवाद आणि दृश्यांमुळे हा वाद आणखी चिघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आराध्याच्या बर्थडे पार्टीचे PHOTO VIRAL, 'या' कारणानं ट्रोल झाली ऐश्वर्या

शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.

या महिलेच्या आवाजापुढे तर रानू मंडल सुद्धा फेल! पाहा VIRAL VIDEO

=====================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 21, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading