छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य आणि भगव्यासाठी प्रत्येक मराठा वेडा आहे! पाहा थरारक Tanhaji Trailer

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य आणि भगव्यासाठी प्रत्येक मराठा वेडा आहे! पाहा थरारक Tanhaji Trailer

आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये चांगल यश मिळवणाऱ्या अजय देवगणनं आता ऐतिहासिक सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. लवकरच त्याचा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक समोर आला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.

शाहरुख खानच्या लेक झाली हिरोईन, पाहा पहिल्या फिल्मचा VIDEO

'तानाजी-द अनसंग वॉरियर' (Tanhaji : The Unsung Warrior) मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या नावाच्या स्पेलिंगमुळे वादाची चिन्ह होती. पण खुद्द तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनीच या दिल्यानं या वादावर सुरू होण्याआधीच पडदा पडला. हा सिनेमा अजयसाठी खूप महत्त्वाचा तर आहेच पण काही कारणानं खूप खासही आहे. कारण हा सिनेमा त्याचा बॉलिवूडमधील 100 वा सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

TMC खासदार नुसरत जहाँच्या प्रकृतीत सुधारणा, ड्रग्जचा ओव्हरडोस?

तानाजी सिनेमात अजय देवगण 17 व्या शतकातील मराठा सैन्यानतील सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढता लढता धारातीर्थी पडले होते. या सिनेमात अजय देवगणसोबत काजोल सुद्धा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं असून सैफ अली खान या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.

सलमान, शाहरुख आणि आलियासह बॉलिवूड कलाकार एकाच थाळीत...

==========================================================

First Published: Nov 19, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading