Tanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज

Tanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज

तानाजी चित्रपट 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अजय देवगण आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर: बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण यांचं तानाजी द अनसंग वॉरियर (Tanhaji: The Unsung Warrior)सिनेमातील पहिलं गाणं मंगळवारी सकाळी रिलीज करण्यात आलं आहे. शंकरा रे शंकरा असं गाण्याचं नाव आहे. या गाण्यात प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा वेगळा आणि दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि काजोलची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 10 जानेवारी 2020 रोजी तानाजी द अनसंग वॉरियर सिनेमा बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित हिंदी चित्रपटाचे नाव योग्य असल्याचा निर्वाळा मालुसरेंच्या वंशजांनी दिला आहे.

शंकरा रे शंकरा गाण्याचा टीझर रिलिज होताच यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर तुफान ट्रेण्ड झाला आहे. या टीझरला तुफान लाईक्सही मिळाले आहेत. हे गाणं मंगळवारी दुपारी रिलीज झालं आहे. अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोमवारी टीझर शेअर केला होता. मंगळवारी सकाळी हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं अपलोड होताच काही मिनिटात 475,452 व्ह्युज मिळाले आहेत.

तानाजी नावावरून दुरस्ती

'तानाजी-द अनसंग वॉरियर' (Tanhaji : The Unsung Warrior) मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या नावाच्या स्पेलिंगमुळे वादाची चिन्ह होती. पण खुद्द तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनीच या दिल्यानं या वादावर सुरू होण्याआधीच पडदा पडला.

अजय देवगणचा 100 वा चित्रपट

हा सिनेमा अजयसाठी खूप महत्त्वाचा तर आहेच पण काही कारणानं खूप खासही आहे. कारण हा सिनेमा त्याचा बॉलिवूडमधील 100 वा सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तानाजी चित्रपटावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे? चिञपटाद्वारे रामदासाचे उदात्तीकरण केले गेले असेल तर चिञपटाचे निर्माते - दिर्ग्दशक यांना याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

अभिनेञी काजोल यांच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छञपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हे सरळ सरळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.

छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छञपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छञपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

या आणि चिञपटातील अन्य आक्षेपार्ह दृष्याबाबत आम्ही निर्माते आणि दिर्ग्दशक यांच्याकडून खुलासा मागवत आहोत. ऐतिहासिक विषयावर चिञपट जरुर निघाले पाहिजेत. परंतु,त्याद्वारे ऐतिहासिक प्रसंगाचे वा व्यक्तींचे ब्राम्हणीकरण,विकृतीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी स्पष्ट केलं.

First published: December 3, 2019, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading