Home /News /entertainment /

'तान्हाजी' फेम कैलास वाघमारेला कुणी पाठवलं इमोशनल पत्र

'तान्हाजी' फेम कैलास वाघमारेला कुणी पाठवलं इमोशनल पत्र

Tanhaji Movie Fame Actor Kailash Waghmare Facebook Post: चुलत्या बायकोला सांगतो आहे, प्रेमपत्र आलंय! नक्की कसलं आणि कुणाचं पत्र आलं त्याला?

  मुंबई, 10 मार्च : आजच्या इमेल, व्हॉट्सप, फोन कॉलच्या काळात पत्र ही कमालीची अ‍ॅन्टिक गोष्ट होऊन बसलेली आहे. पोस्टमन आता फक्त ऑफिशियल कागदपत्रं पोचवण्यापुरता उरल्याचं चित्र दिसतं. अशात एखाद्या सेलिब्रिटिला कुणी लांबलचक पत्र लिहितं ही गोष्ट दुर्मिळच.  हा दुर्मिळ आनंद अभिनेता कैलाश लीला वाघमारेच्या ((Tanhaji Movie Actor Kailash Leela Waghmare)वाट्याला नुकताच आला. त्यानं सोशल मिडीयावर एक मस्त पोस्ट लिहित तो चाहत्यांसोबत वाटून साजराही केला. अनेकांना माहीत नसेल, पण कैलाश गायक-अभिनेता असण्यासह एक चांगला लेखकही आहे. त्याच्या कथा-कविता चांगल्या नियतकालिकांमधून आजवर प्रकाशित झाल्या आहेत. (Chultya fame actor Kailash Waghmare) कैलाशनं पत्र आल्याची पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यातही त्याच्यातल्या चांगल्या लेखकाची झलक दिसते. पत्नी 'देवकी'फेम मीनाक्षी राठोडसोबत यानिमित्तानं त्याचा मजेदार संवादही झाला आहे. (Actor Kailash Waghmare on Facebook) कैलाश लिहितो, 'दारावरची बेल वाजली. बघितलं तर पोस्टमन होता. खाकी कपडे , काखेत पांढरा झोला. हातात कागदांचा गठ्ठा. पुर्ण वेषभूषेत! मी थोडासा गडबडलोच. काय आहे? पटकन विचारले. तो म्हणाला... पत्र. हे ऐकून मीनाक्षीनं आतूनच विचारले 'कसलं पत्र आहे रे?' मी म्हणालो प्रेमपत्र! आम्ही दोघेही हसलो. पोस्टमनही हसला. त्याच्या खाकी कपड्यांकडे आणि झोल्याकडे बघत बघत मी पत्रस्विकाराची सही मारली.. (Kailash waghmare fb post about letter)
   गावी असताना खूप वाटायचं आपल्या घरी पोस्टमन यावा. पण कधी कुणाचे पत्रच यायचे नाही. आणि आलेच हुकून चुकून तर पोस्टमन बाजाराच्या गावी आमच्या गावच्या न्हाव्याच्या दुकानात किंवा खतऔषधाच्या दुकानदाराकडे पत्र द्यायचा. मग संध्याकाळी त्याचे लहान पोर जीवावर आल्यासारखे कसनुसं तोंड करून ते पत्र आणून द्यायचे. त्यामुळे आपल्यासाठी काहीतरी स्पेशल आल्याची भावना त्यातून निघून जायची.
  आज माझ्या साठी पोस्टमन घरापर्यंत आला होता. जनुकाही फक्त मला पत्र पोहचविण्यासाठीच त्याने ते कपडे घातले होते असे मला वाटले. मी लिफाफा उलटपालट करून पाठवणाराचे नाव बघितले. नाव होते. 'ऋतुजा!' (actor kailash waghmare receives a letter) ऋतुजा सीमा महेंद्र या अहमदनगरच्या 'वोपा' या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या युवा कार्यकर्ता आहेत. ही संस्था महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण मिळावं यासाठी झोकून देत काम करते. कैलाशनं या संस्थेला काही काळापूर्वी भेट दिली होती. या भेटीत दिलेल्या शुभेच्छांना उत्तर म्हणून त्याला हे भरभरून भावना व्यक्त करणारं सुंदर पत्र मिळालं आहे. हेही वाचा पाहिले न मी तुला : खणाच्या साडीत खुलली 'मनू'; नव्या PHOTO शूटवर चाहते फिदा या पोस्टमध्ये पुढं कैलाश लिहितो, 'पत्राला एक पॉझिटिव्ह गंध होता. अधाशासारखे लिफाफा फोडला आत एक साधे वहीचे पान होते. त्यावर मी दिलेल्या शुभेच्छांना उत्तर होते. मी आजपर्यंत माझ्या कळत नकळत केलेल्या सगळ्या चांगल्या कामांच्या नोंदी होत्या त्यात. माझ्या बद्दल खूप भरभरून लिहिले होते तिने... बऱ्याच वर्षांपासून पत्र पाठवायचे होते तिला. फोनवर नाही बोलली हे बरंच केल तिनं नसता या अनोख्या अनुभवाला मुकलो असतो मी... तिच्या पत्राचे उत्तर पत्रानेच देणार आहे मी. माझ्या पुस्तकांच्या पुंजक्यात पत्रांचही एक गाठोडं आहे. त्या गाठोड्यातील माणसं कंटाळली असतील त्याच त्या लोकांसोबत गप्पा मारुन. या नव्या पत्राला बघून नक्कीच खुश होतील ती जुनी पत्रं. या पत्राने मीनाक्षी आणि माझ्या आयुष्यातील सगळ्या पत्रांची पुन्हा देवाणघेवाण केली आम्ही! खरच! पत्र नुसते शब्द घेऊन येत नाही. जगणं घेऊन येते.' हेही वाचा अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत, ही आहे संग्रामची बायको... या इमोशनल पोस्टचा शेवट करताना या अभिनेत्यानं 'लिहूयात का आपण सगळेजण एकमेकांना पत्र?' असं आवाहन करणारा प्रश्नही विचारला आहे. कैलास सध्या 'सेम सेम बट डिफरंट' नावाचा आगळा म्युझिकल शो करतो आहे. यात त्याच्यासह जान्हवी श्रीमांकर स्टेज शेअर करते. लोकसंगीताची मराठी, हिंदी आणि इंग्रजी संगीताशी सुरेल सांगड घालून केलेली पेशकश रसिकांची दाद मिळवते आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Actor, Facebook, Social media

  पुढील बातम्या