Marathi Trailer - Tanhaji : 'प्रत्येक मराठ्यात दडलाय लाख मराठा', पाहा VIDEO

Marathi Trailer - Tanhaji : 'प्रत्येक मराठ्यात दडलाय लाख मराठा', पाहा VIDEO

तानाजी हा चित्रपट हिंदीसोबत मराठीतही प्रदर्शित होणार आहे. आता याचा मराठी ट्रेलर रिलीज कऱण्यात आलाय.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या एक एक मावळ्याने आपल्या जिवाची बाजी लावली. कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या मुलाचं लग्न असतानाही ते सोडून मोहिमेवर गेलेल्या तानाजी मालुसरे यांच्यावर तान्हाजी हा हिंदी चित्रपट येत आहे. याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला होता. हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार असून त्याचा मराठी ट्रेलर रिलिज झाला आहे.

तानाजी चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे. 'जसा मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतो, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना....तसाच प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा...' अशा जबरदस्त संवादात चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.

शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसला असून सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कमतरता सोडलेली नाही.

कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये चांगल यश मिळवणाऱ्या अजय देवगणनं आता ऐतिहासिक सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. लवकरच त्याचा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 01:08 PM IST

ताज्या बातम्या