मुंबई, 10 जानेवारी : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) झालेल्या हिंसाचारानंतर दीपिका पदुकोणने डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेबरोबर JNU मध्ये हजेरी लावली. त्यावरून बरीच चर्चा झाली. आता Tanhaji चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र अजय देवगणने पहिल्यांदाच याविषयी जाहीररीत्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"नेमकं काय घडलं यातलं तथ्य बाहेर येईपर्यंत आपण सर्वांनीच वाट पाहिली पाहिजे, असं माझं नेहमीच म्हणणं असतं." असं त्यानं म्हटलं आहे. याशिवाय बंधुभाव टिकवून ठेवण्याचं आवाहनही त्यांनं केलं आहे. यासंदर्भात अजयने केलेल्या या Tweet मधून त्याने दीपिकाच्या भूमिकेवर टोमणा मारला, अशी चर्चा आहे. "माझं आवाहन आहे की, शांतता आणि बंधुभावाची भावना अशीच नेऊ या. उगीच जाणीवपूर्वक किंवा बेजबाबदारपणे उगाच तोल जाऊ देऊ नका", अजयनं हा सल्ला देताना कुणाचं नाव घेतलेलं नसलं, तरी दीपिका पदुकोणनं घेतलेल्या जाहीर भूमिकेवरून तिलाच हा सल्ला दिला आहे, अशी चर्चा आहे.
I have always maintained that we should wait for proper facts to emerge.
I appeal to everyone- let us further the spirit of peace and brotherhood, not derail it either consciously or carelessly #JNUViolence — Ajay Devgn (@ajaydevgn) January 10, 2020
दीपिकाने JNU मध्ये हजेरी लावल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली तर सेलेब्रेटींसह अनेकांनी तिचं कौतुकही केलं. दीपिकाच्या 'छपाक'वर त्याचा परिणाम होईल, असंही बोललं जात होतं. #BycottChhapaak असा हॅशटॅग ट्रेंड होत होता. पण इतके दिवस शांत असलेल्या अजय देवगणनं या सगळ्यावर व्यक्त व्हायला 'तानाजी' चित्रपट रीलिज व्हायच्या दिवशीचाच मुहूर्त निवडला आहे. दीपिकाचा 'छपाक' आणि अजयचा 'तानाजी' आज एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
हे वाचा -लग्नानंतरच्या बॅड पॅचबद्दल बोलली काजोल; सांगितलं वैयक्तिक आयुष्यातलं दुःख
दीपिका JNUमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली. तर त्याला जोरदार विरोधही सोशल मीडियावर करण्यात आलाय. भाजपने दीपिकावर टीकेची झोड उठवलीय तर काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी तिला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषीत केलाय. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडने हा निर्मय घोषीत केलाय. 'छपाक' शुक्रवारी 10 जानेवारीला प्रदर्शित होतेय. तर त्या आधीच एक दिवस या राज्यांनी 'छपाक' टॅक्स फ्री केल्याने त्यावरही आता राजकारण सुरू झालंय.
--------------
अन्य बातम्या
Chhapaak टॅक्स फ्री करण्याची आव्हाडांची भूमिकेवरून Twitter युद्ध
काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'बाबत घेतला मोठा निर्णय
दीपिकाच्या ‘छपाक’मध्ये आरोपी नदीमचं नाव राजेश आहे का? वाचा काय आहे सत्य
कंगनाच्या बहिणीवरही झाला होता भीषण अॅसिड अटॅक; दीपिकाला पाठिंबा देण्याचं कारण
एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Deepika padukone, JNU