Home /News /entertainment /

Web Series वरुन सुरू झालं 'तांडव'; 'हात जोडून, गुडघे टेकून माफी मागा अन्यथा...'BJP नेत्याचा इशारा

Web Series वरुन सुरू झालं 'तांडव'; 'हात जोडून, गुडघे टेकून माफी मागा अन्यथा...'BJP नेत्याचा इशारा

सैफ अली खान, डिंपल कपाड़िया अभिनीत वेब सीरीज 'तांडव' (Tandav) शुक्रवारी रिलीज होताच नवा वाद सुरू झाला आहे.

  मुंबई, 17 जानेवारी : सैफ अली खान, डिंपल कपाड़िया अभिनीत वेब सीरीज 'तांडव' (Tandav) शुक्रवारी रिलीज होताच नवा वाद सुरू झाला आहे. या वेब सीरिजवर (Web series)आरोप आहे की, याच्या माध्यमातून हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम म्हणाले की, या सीरिजमध्ये भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. ते पुढे म्हणाले की, अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी लागेल. भाजप नेता राम कदम म्हणाले की, सीरिजचे निर्माता निर्देशक यांनी हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागायला हवी. जर त्यांनी असं केलं नाही तर चौकात चपला मारल्या जातील. पुढे ते म्हणाले की, जोपर्यंत आवश्यक बदल केला जात नाही, तोपर्यंत तांडववर बहिष्कार घालण्यात येईल. हे ही वाचा-गाडीला धडक दिली म्हणून चापट मारली, महेश मांजरेकरांचा VIDEO व्हायरल ते म्हणाले, प्रत्येक वेळी चित्रपट आणि वेब मालिकांमधून  हिंदू देवतांचा अपमान केला जातो. सैफ अली खान पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या चित्रपटाचा किंवा मालिकेचा भाग आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरला भगवान शंकराविषयीचा उपहासात्मक भाग मालिकेमधून काढून टाकावा लागेल. अभिनेता झीशान अयूबला माफी मागावी लागेल. आवश्यक बदल होईपर्यंत तांडववर बहिष्कार टाकला जाईल." त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करीत सीरिजचे निर्माता, निर्देशक आणि अभिनेत्यांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार मनोज कोटक यांनादेखील या सीरिजविरोधात केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री,  प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे आणि तांडव विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Mumbai, Saif Ali Khan

  पुढील बातम्या