अजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री

अजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री

आता नवी बातमी आलीय. 'तानाजी' सिनेमात एका सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 आॅक्टोबर : अजय देवगणचा सिनेमा 'तानाजी' सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमात सैफ अली खान काम करतोय, ही बातमी पुढे आली होती. आता नवी बातमी आलीय. 'तानाजी' सिनेमात एका सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे.

तो सुपरस्टार कोण आहे? आता श्वास रोखून ऐका. अजय देवगण आणि त्या सुपरस्टारनं 19 वर्षांपूर्वी एका सिनेमात काम केलं होतं. तो सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. त्या सिनेमाचं नाव होतं हम दिल दे चुके सनम.

म्हणजे आता तुम्ही नक्कीच ओळखलं असणार. तानाजीमध्ये सलमान खान आहे. सूत्रांकडून कळलेल्या माहितीनुसार तो शिवाजीची भूमिका करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणनेत्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत  झळकणार आहे.

‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, अशी कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला होता.

ओम राऊत सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. अजय देवगणसोबत नितीन वैद्य या सिनेमाची निर्मिती करतायत. सिनेमा 2019मध्ये रिलीज होईल.

20 वर्षांपूर्वी सलमानची 'वधू' पळवून नेली होती शाहरुखनं, करणनं ताज्या केल्या आठवणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 04:15 PM IST

ताज्या बातम्या