मुंबई, 28 नोव्हेंबर : सोशल मीडिया जसा अनेक चांगल्या गोष्टींसाठी वापरला जातो तसाच त्याचा अनेकजण गैरवापरही करत असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियामुळेही अनेकांना मोठमोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार एका अभिनेत्रीसोबत घडला आहे. सोशल मीडियामुळे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला बऱ्याच त्रासापासून जावं लागलं आहे. अभिनेत्रीसोबत एक लाजिरवाणी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि आरोपीने नक्की काय केलं याविषयी जाणून घेऊया.
साऊथ अभिनेत्रीच्या फोटोंशी छेडछाड करुन एका अज्ञान व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला होता. आज तकच्या वृत्तानुसार, हे फोटो शेअर करत अभिनेत्रीविषयी असभ्य भाषा वापरत शिवीगाळही गेला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीवर कारवाई करत त्याला अटक केलं आहे. इंटरनेटवर टॉलिवूड अभिनेत्रीच्या इज्जतीशी खेळणाऱ्या आरोपीचे नाव पंडिरी राम व्यंकट वीरराजू असं आहे. आंध्रप्रदेशातील या आरोपीचे वय 30 वर्ष असून त्याने अभिनेत्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - 'लहानपणीही बॅग्राउंडला आणि आत्ताही...'; अभिनेत्याने सांगितली आयुष्यातील 'ती' गोष्ट
आरोपीने फेक अकाउंट बनवून तेलुगु अभिनेत्रीचे अश्लील फोटो शेअर केले होते. आरोपीने ट्विटरवर 'Sairavi267' या युजरनेमने बनावट अकाउंट तयार केले. त्याने ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमांवर हे फोटो शेअर केले. सोबतच अर्वाच्च भाषाही वापरली. आरोपीने अतिशय धुर्तपणे प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठलाग केला. तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं. अभिनेत्रीच्या मिळत असलेल्या प्रत्येक माहितीनुसार तो पोस्ट टाकायचा. आरोपीने सोशल मीडियावरुन अभिनेत्रीची संपूर्ण माहिती काढली आणि त्याचा गैरवापर केला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची अजून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आजकाल स्टार्स आणि सेलेब्सची माहिती सोशल मीडियावर सहज उपलब्ध होते. त्यामुळे असे आरोपी या माहितीचा पुरेपूर फायदा घेतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Social media, Social media viral