मुंबई, 27 जुलै : दाक्षिणात्य अभिनेत्री विजयालक्ष्मीने (Vijayalakshmi) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येआधी विजयालक्ष्मीने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत, थोड्याच वेळात माझा मृत्यू होणार आहे, असे सांगितले होते. याआधी अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मला काही लोकं त्रास देत असल्याचे सांगितले होते. या सगळ्या प्रकारामुळे विजयलक्ष्मी मानसिक तणावात होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार विजयालक्ष्मीने फेसबुकवरील व्हिडीओ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. गेल्या चार महिन्यांपासून सीमन आणि त्याच्या पक्षाच्या लोकांमुळे मी खूप तणावात आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा खूप प्रयत्न केला पण ते आता शक्य नाही. हरी नादर यांनी मीडियामध्ये माझा खूप अपमान केला आहे. मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. काही काळांत, माझे रक्तदाब पूर्णपणे कमी होईल आणि मी मरेन. मी चाहत्यांना आवाहन करते की सीमन आणि हरी नादर यांच्यासारख्या लोकांना शिक्षा द्या. लोकांचे मानसिक शोषण करणाऱ्या लोकांना कडक शिक्षा झालीच पाहिजे". हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर विजयालक्ष्मीची तब्येत खालवली. मात्र वेळेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
सीमान हा एक तामिळ राजकीय पक्ष असून हरि नारद हे या पक्षाचे नेते आहेत. विजयालक्ष्मी हिने फ्रेण्ड्स या चित्रपटामधून तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती कानडी चित्रपटांमध्ये काम करु लागली. मात्र मागील काही काळापासून तिला काम मिळत नव्हते. आत्महत्येआधी विजयालक्ष्मीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांनी हरि नारद आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.