मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Actress Suicide : प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; अवघ्या 29व्या वर्षी पंख्याला लटकून संपवलं आयुष्य

Actress Suicide : प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; अवघ्या 29व्या वर्षी पंख्याला लटकून संपवलं आयुष्य

अवघ्या 29व्या वर्षी अभिनेत्रीनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. यामागचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे.

अवघ्या 29व्या वर्षी अभिनेत्रीनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. यामागचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे.

अवघ्या 29व्या वर्षी अभिनेत्रीनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. यामागचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 20 सप्टेंबर :  मागच्या काही महिन्यांपासून साउथ सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या आत्महत्येचे प्रकार समोर येत आहे. अशातच आता तमिळ सिनेसृष्टीतील एक खळबळजनक माहिती समोर येत आहे.  तमिळ अभिनेत्री पॉलिन जेसिका उर्फ दीपानं आत्महत्या केली आहे. चेन्नई राहत्या घरी तिचा मृतदेख पंख्याला लटकलेला आढळला. आत्महत्या करतेवेळी तिनं एक चिठ्ठी देखील लिहिली. तिच्या डायरीमध्ये एक नोट देखील सापडली आहे. पोलिसांनी या नोटला सुसाइड नोट म्हणून गृहीत धरलं आहे.  ज्यात तिनं या सगळ्याला तिच्या रिलेशनशिपला जबाबदार धरलं आहे.  29 वर्षीय दीपाचा आत्महत्येनंतर तमिळ सिनेसृष्टी चांगलीच हादरुन गेली आहे.

अभिनेत्री दीपानं फार कमी वयात तिचं करिअर केलं. आत्महत्या करुन ती तिचं आयुष्य संपवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तिच्या जाण्यानं तिच्या कुटुंबिय आणि मित्र मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, दीपाचा मित्र प्रभाकरन यानं पोलिसांना माहिती दिली. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर सर्वात आधी तो पोहोचला त्यानंतर त्यानं ही माहिती अभिनेत्रीच्या भावाल दिली. भावाने बहिणीच्या आत्महत्येची माहिती कोयम्बेड्डु पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा - 250हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीकडे उपचारांसाठी नाहीत पैसे; सरकारी रुग्णालयात आहे अँडमिट

 

पोलिसांना तपासांती दीपाच्या रूममध्ये एका डायरी मिळाली ज्यात एक नोट लिहिलेली होती.  ही नोट सुसाइट नोट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  ज्यात अभिनेत्रीनं तिला तिचं आयुष्य आवडत नाही असं म्हटलं आहे. तिला सपोर्ट करणारे कोणीही नाहीत असंही तिनं लिहिलं आहे.  दीपाने नोटमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यातील एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  तिनं नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे, ती रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यात तिला धोका मिळाला.  त्यामुळे तिनं तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

दीपाच्या नोटमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार पोलीस तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून अभिनेत्रीच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: South actress, South film