नवी दिल्ली, 21 मार्च: मालदीव आणि सेलेब्सच एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. अनेक सेलिब्रेटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये जात असतात. अशीच एक बॉलीवूडची अभिनेत्री मालदीवमध्ये गेली आहे. पण तिथे भलतच पाहायला मिळालं. ज्याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत जोरदार रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia) सध्या मालदीवमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. तमन्नाने मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेअर केलेल्या फोटोत तमन्ना मालदीवमध्ये सायकलवर बसून आईस्क्रीम विकताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तमन्नाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, विचार करा सगळी आइसक्रीम कोणच्या ट्रंकमध्ये आहेत. तमन्नाच्या या फोटोला चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शिवाय अनेक चाहत्यांनी तिचा हा फोटो शेअरही केला आहे.
View this post on Instagram
तमन्नाच्या या फोटोंवर मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. का युजरने लिहिले आहे की, "आमच्याकडेही आईस्क्रीम विकायला या." असे म्हटले आहे.
या फोटोमध्ये तमन्नाने प्रिंटेड टीशर्ट सोबत ब्लू डेनिम शॉर्ट घातली आहे. तसंच कानात छोटे झुमके आणि नेक पीस परिधान केला आहे. अभिनेत्रीने या लूकमध्ये मोकळे केस सोडले आहेत.
तमन्ना नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment