'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया कोरोना पॉझिटिव्ह

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया कोरोना पॉझिटिव्ह

तमन्ना भाटियाच्या (tamannaah bhatia) आई-वडिलांना याआधी कोरोनाची लागण झाली होती.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर :  अभिनेत्री तमन्ना भाटियालाही (Tamannaah bhatia)  कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते आहे. या अभिनेत्रीच्या आई-वडिलांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला होतो. तिनं स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली होती.

ऑगस्टमध्ये या अभिनेत्रीच्या पालकांना कोरोना झाला. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. आता अभिनेत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. नमस्ते तेलंंगणाने याबाबत वृत्त दिलं आहे.

26 ऑगस्टला तमन्नाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.  "माझ्या पालकांमध्ये कोरोनासारखी सौम्य लक्षणं दिसत होती. आम्ही त्यावेळी घरात आवश्यक ती खबरदारी घेतली आणि घरातील सर्वांनी कोरोना टेस्ट केली. दुर्दैवाने माझ्या पालकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व काळजी घेत आहोत" त्यावेळी तिनं आपल्या आई-वडिलांशिवाय कुटुंबातील कुणालाही कोरोना झाला नसल्याचं सांगितलं होतं. पण आता तिलाही कोरोना झाला आहे.

हे वाचा - बॉलिवूडला आणखी एक धक्का, वयाचा 27व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू

सध्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाला आहे. सध्या त्या होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याआधी  'आई माझी काळूबाई' या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

हे वाचा - 5 महिन्यांच्या प्रेग्ननंट करीनाचा PHOTO व्हायरल; बेबोने सांगितली आपली अवस्था

बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. तसंच कित्येक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 2:36 PM IST

ताज्या बातम्या