मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बाहुबली' अभिनेत्रीने कोरोनाला हरवलं; घरी येताच खास सदस्याने धावत येत मारली मिठी

'बाहुबली' अभिनेत्रीने कोरोनाला हरवलं; घरी येताच खास सदस्याने धावत येत मारली मिठी

तमन्ना भाटियाने (tamannaah bhatia) कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लढा जिंकल्यानंतर तिच्या घरातील या सदस्याला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

तमन्ना भाटियाने (tamannaah bhatia) कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लढा जिंकल्यानंतर तिच्या घरातील या सदस्याला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

तमन्ना भाटियाने (tamannaah bhatia) कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लढा जिंकल्यानंतर तिच्या घरातील या सदस्याला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

  मुंबई, 15 ऑक्टोबर : बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) कोरोनाव्हायरसशी (coronavirus) यशस्वी लढा दिला आहे. ती आता घरी परतली आहे. घरी येताच तिच्या घरातल्यांनी तिचं स्वागत केलंच मात्र तिच्या घरातील खास सदस्याने तिला पाहताच धावत येत मिठी मारली आहे. तमन्ना सुखरूप घरी आल्याचा आनंद या सदस्यालाच सर्वात जास्त झाला. तमन्ना एका शूटिंगसाठी हैदराबादला गेली होती. तेव्हा तिला कोरोना झाला. तिथल्याच एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचार झाल्यानंतर 5 ऑक्टोबरला तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यानंतर ती होम क्वारंटाइन होती. आता ती आपल्या आई-वडिलांच्या घरी परतली आहे. घरी येताच तिच्या घरातल्यांनी तिचं स्वागत केलं. मात्र तिच्या आईवडिलांपेक्षाही सर्वात जास्त आनंद झाला होत तिच्या कुत्र्याला. तमन्ना घरात शिरताच तो धावत तिच्याजवळ आला आणि त्याने तिला अक्षरश: मिठी मारली.
  View this post on Instagram

  A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

  ऑगस्टमध्ये तमन्नाच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. तिने स्वत: याची माहिती आपल्या सोशल मीडियावर दिली होती. त्यावेळी तिची टेस्ट नेगेटिव्ह होती. मात्र काही दिवसांनी तमन्नादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्यानंतर लगेच तिच्यावर उपचार सुरू झाले. हे वाचा - वाह संजूबाबा मानलं तुला ! म्हणला, "कॅन्सरशी जिद्दीने झुंज देणार" पाहा VIDEO काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने कोरोनावर मात केली आहे. त्याआधी बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. तसंच कित्येक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत. हे वाचा - सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव मराठी मालिकांचे कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाला होता. त्याआधी  'आई माझी काळूबाई' या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Coronavirus

  पुढील बातम्या