अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरात कोरोनाचा शिरकाव; म्हणाली, "दुर्दैवाने माझे पालक..."

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरात कोरोनाचा शिरकाव; म्हणाली,

अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah bhatia) आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या कोरोना रिपोर्टबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेत्री तमन्ना भाटियाच्याही (Tamannaah bhatia) घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. तमन्नाच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान तमन्नाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. तमन्नाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. तमन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कोरोना रिपोर्टबाबत सांगितलं आहे.

तमन्ना म्हणाली, "माझ्या पालकांमध्ये कोरोनासारखी सौम्य लक्षणं दिसत होती. आम्ही त्यावेळी घरात आवश्यक ती खबरदारी घेतली आणि घरातील सर्वांनी कोरोना टेस्ट केली. दुर्दैवाने माझ्या पालकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व काळजी घेत आहोत"

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

"माझ्यासह माझ्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोना झाला नाही. मी, माझ्या कुटुंबातील सदस्य आणि स्टाफ सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. देवाच्या आशीर्वादाने माझे पालकही यातून बरे होतील. तुमच्या प्रार्थनेमुळे त्यांना लवकर बरं होण्यास मदत होईल", असं तमन्ना म्हणाली.

हे वाचा - मेकअपशिवाय अधिक सुंदर दिसते तमन्ना, सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हे लुक्स हिट

काही दिवसांपूर्वीच बच्चन कुटुंबाने कोरोनावर मात केली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. आता त्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. तसंच कित्येक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत.

Published by: Priya Lad
First published: August 26, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या