मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tamannaah Bhatia : इंटिमेट सीन शूट करताना पुरुषांच्या काय भावना असतात? तमन्ना भाटियाने केला खुलासा

Tamannaah Bhatia : इंटिमेट सीन शूट करताना पुरुषांच्या काय भावना असतात? तमन्ना भाटियाने केला खुलासा

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्येही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचा चाहता वर्ग जगभरात आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 31 डिसेंबर : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्येही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचा चाहता वर्ग जगभरात आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत स्क्रीनवर रोमँटिक आणि आव्हानात्मक अशा अष्टपैलू भूमिका केल्या आहेत. 'बाहुबली चित्रपटानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. तमन्ना तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. ती चित्रपट आणि तिच्या पर्सनल लाइफबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर मोकळेपणाने उत्तरं देत असते. आता अभिनेत्रीने चित्रपटातील इंटिमेट सीन्सबद्दल काही खुलासे केले आहेत.

  आजच्या जमान्यात चित्रपट कोणताही असो, जवळपास प्रत्येक चित्रपटात इंटिमेट सीन्स पाहायला मिळतात. तमन्ना भाटियाने एका मुलाखतीत याबदद्ल खुलासा केलाय आणि जेव्हा इंटिमेट सीन शूट केले जातात, त्या वेळी पुरुष कलाकारांना कसं वाटतं, याबद्दल तिने मुलाखतीत सांगितलंय.

  दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने सांगितलं की, पुरुष कलाकार नेहमीच बेडरूम सीन किंवा किसिंग सीनचा आनंद घेतात, असं अजिबात नाहीये. कधीकधी पुरुष कलाकार अभिनेत्रींपेक्षा जास्त नर्व्हस होतात आणि विचित्र पद्धतीने किसिंग सीन शूट करतात. कलाकारांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसं की अभिनेत्री त्यांच्याबद्दल काय विचार करेल किंवा सीन कसा असेल, असंही तमन्ना म्हणाली. पहिल्यांदाच एका अभिनेत्रीने इंटिमेट सीनबद्दल पुरुष कलाकारांच्या भावना लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे ही बाजू ऐकून प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटलं.

  हेही वाचा -  Abhijeet Bichukale : माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार; अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा

  तमन्ना भाटियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले आहे. तमन्नाच्या अभिनयापासून ते तिच्या डान्सचेही अनेक चाहते आहेत. तमन्नाची पर्सनॅलिटीही लोकांना खूप आवडते. आता तिने चित्रपटांमधील बोल्ड आणि इंटिमेट सीनबदद्ल मुलाखतीत माहिती दिल्याने लोक तिच्या समजूतदारपणाचं कौतुक करत आहेत.

  साधारणपणे चित्रपटातील इंटिमेट सीन अभिनेत्यांकडून आनंदाने केले जातात, किंवा ते एंजॉय करतात, अशी टीका केली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा तमन्ना भाटियाने शूटिंगदरम्यान घडलेल्या इंटिमेट सीनबद्दल काही खुलासे केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इंटिमेट सीन शूट करताना लोकांना वाटतं तशी परिस्थिती वास्तवात नसते, असं तमन्नाने मुलाखतीत सांगितलं.

  दरम्यान, तमन्ना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसेच ती अनेकदा ट्रेंडी व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करते. अभिनेत्री तिच्या अप्रतिम अभिनयासह तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते.

  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Romance, South film