‘बाहुबली’च्या या अभिनेत्री आहे विकी कौशलसाठी वेडी, म्हणते एकदा तरी करायचंय डेट

‘बाहुबली’च्या या अभिनेत्री आहे विकी कौशलसाठी वेडी, म्हणते एकदा तरी करायचंय डेट

काही दिवसांपूर्वी तिने सिनेमात हृतिक रोशलसोबत किसिंग सिन करायला काही हरकत नसल्याचं म्हटलं. त्याच्यासाठी ती ‘नो किसिंग क्लॉज’ बदलायलाही तयार आहे.

  • Share this:

मुंबई, २८ मार्च- सध्या विकी कौशलच्याच नावाची चर्चा बी-टाऊनमध्ये पाहायला मिळते. राजी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राइक या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तो अनेक तरुणींच्या हृदयचा ताईत झाला आहे. विकीच्या चाहतींमध्ये बाहुबली स्टा तमन्ना भाटीयाच्या नावाचाही सहभाग आहे. एका मुलाखतीत तमन्नाने तिला विकीला डेट करायची इच्छा असल्याचं म्हटलं.

सध्या तमन्ना तिच्या वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत आहे. मुलाखतीत तिने विकीला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. याआधीही तिने अशाप्रकारचे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिने सिनेमात हृतिक रोशलसोबत किसिंग सिन करायला काही हरकत नसल्याचं म्हटलं. त्याच्यासाठी ती ‘नो किसिंग क्लॉज’ बदलायलाही तयार आहे.

View this post on Instagram

‍♀️‍♀️‍♀️

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

हे सर्व तिने मस्करीत म्हटलं असलं तरी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला #metoo बद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, ‘मीटू कॅम्पेन अंतर्गत अनेकांनी वेगवेगळ्या लोकांवर बरेच आरोप केले. मला वाटतं की कोणत्या मुलीसोबत काही चुकीचं झालं आहे आणि ती सोशल मीडियावर शेअर करण्याची हिंम्मत दाखवते तर ही फार मोठी गोष्ट आहे.’

तसं तमन्नाला मीटू ही एक चळवळ कमी आणि पीआर स्टंट जास्त वाटतो. तमन्ना म्हणाली की, ‘माझ्यामते मीटू चळवळ आता पीआर स्टंट जास्त झाला आहे. आता याचं गांभीर्य पूर्वीसारखं राहिलं नाही. या चळवळीला जो मान मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि लोकांनीही हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही.’

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

फक्त एवढंच नाही तर तमन्नाने साजिद खानसोबत काम करताना कोणताही त्रास न झाल्याचं स्पष्ट केलं. तिच्यामते, साजिदने कधीही तिला वाईट वागणूक दिली नाही. प्रत्येक माणसाचा दुसऱ्या माणसासोबत वेगवेगळा अनुभव असू शकतो आणि प्रत्येकाला तो अनुभव सांगण्याचा अधिकार आहे.

VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात

First published: March 28, 2019, 6:32 AM IST

ताज्या बातम्या