बाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग!

बाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग!

रणवीर सिंगचा खिलजी चांगलाच गाजला. एरवी हिरोची भूमिका साकारणारा रणवीर व्हिलनच्या भूमिकेतही लोकप्रिय ठरला. ऐतिहासिक सिनेमांचं आकर्षण नेहमीच प्रेक्षकांना असतं.

  • Share this:

मुंबई, ०९ आॅगस्ट : रणवीर सिंगचा खिलजी चांगलाच गाजला. एरवी हिरोची भूमिका साकारणारा रणवीर व्हिलनच्या भूमिकेतही लोकप्रिय ठरला. ऐतिहासिक सिनेमांचं आकर्षण नेहमीच प्रेक्षकांना असतं. बाजीराव मस्तानी, पद्मावत या सिनेमांनी बाॅक्स आॅफिसवर तर इतिहासच रचलाय. आता करण जोहरनं आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केलीय.

आज ट्विटरवर त्यानं नव्या सिनेमाबद्दल माहिती दिलीय. सिनेमाचं नाव आहे तख्त. ही मुघल काळातली कथा आहे. त्यात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर अशी मोठी स्टारकास्ट आहे.  यात औरंगजेबाचीही व्यक्तिरेखा आहे. आणि ती रणवीर सिंगच करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीरचा खलनायक पाहायला मिळणार आहे. प्रेमासाठी झालेलं युद्ध म्हणजे तख्त असं करणनं म्हटलंय.

हेही वाचा

राधिकाच्या आयुष्यात येणार मोठं वळण, मग शनायाचं काय होणार?

संभाजी साकारताना डाॅ. अमोल कोल्हेंनी 'या' गोष्टींची घेतली काळजी

PHOTOS - दिवसेंदिवस बिघडतेय कपिलची तब्येत, समोर आले आजारपणाचे फोटो

काही दिवसांपूर्वी करणनं कलंकची घोषणा केली होती.माधुरी दीक्षित आणि संजय दत्तचा सिनेमा कलंकबद्दल खूप उत्सुकता आहे. अर्थात, माधुरी कुठल्या भूमिकेत असेल याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात होतेच. पण आता माधुरीच्या भूमिकेबद्दल कळलंय. कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे.

देवदासमध्ये माधुरी दीक्षितनं वेश्या साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा ती अशाच भूमिकेत दिसणार आहे. कलंक हा पीरियड ड्रामा आहे. त्यात संजय दत्त राजाच्या भूमिकेत असेल.

माधुरी आणि संजय दत्त २५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करतायत. याशिवाय सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही भूमिका आहेत.

First published: August 9, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading