Home /News /entertainment /

कंगनाला शिवसेनेशी 'पंगा' पडणार महागात, प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे खळबळ

कंगनाला शिवसेनेशी 'पंगा' पडणार महागात, प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे खळबळ

दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. त्यामुळे आता या वादात केंद्रीय मंत्री अमित शहांनी उडी घेतली आहे.

    मुंबई, 07 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनामध्ये वाद चांगलाच पेटला आहे. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. सध्या विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित असल्यामुळे त्यांच्याकडे हे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात कंगना राणावत हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्या संदर्भात विधानसभेत एकमताने ठराव पारीत करावा अशी मागणी  प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यांच्या या मागणी करणाऱ्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले आहे. कंगनाला Y प्लस दर्जाची सुरक्षा दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. त्यामुळे आता या वादात केंद्रीय मंत्री अमित शहांनी उडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून  Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24x7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते. ही तर भाजपची पोपट, विजय वडेट्टीवारांची टीका तर, मुंबईला पाकव्याप्त भाग म्हणणारी अभिनेत्री कंगना राणावतवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जळजळीत टीका केली आहे. कंगना रानावतने मुंबईला पाकव्याप्त भाग असल्याचे म्हटले होते. मुंबईला कुणी पाकव्याप्त भाग म्हणत असेल  आणि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे हे देशभक्त आहे का? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना उपस्थितीत केला. जर असं वक्तव्य करून कंगना देशभक्त ठरत असेल तर वाय  कशाला तर तिला झेड सुरक्षा द्या. कंगना ही भाजपची पोपट आहेत अशी जळजळीत टीका विजय वड्डेटीवार यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kangana ranaut, Pratap sarnaik, Shivsena, प्रताप सरनाईक

    पुढील बातम्या