जेव्हा पर्ण पेठे सायबर क्राइममध्ये अडकते...

  • Share this:

वाय झेड, फास्टर फेणे, फोटोकॉपी या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे.  'टेक केअर गुड नाईट' या सिनेमात पर्ण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृति करण्याचे काम करेल' असे पर्ण पेठे म्हणाली

'ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृति करण्याचे काम करेल' असे पर्ण पेठे म्हणाली.

ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. यातली मुलगी म्हणजे पर्ण पेठे ही नेहमी इंटरनेटमध्येच दंग असते. पण एक दिवस ती एका क्राइममध्ये सापडते.

पर्ण सांगते, ' पहिल्यापासूनच मी इरावती हर्षे यांची चाहती होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणे मी भाग्यच समजते. ' गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पर्ण सांगते, सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी सिनेमा आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 02:29 PM IST

ताज्या बातम्या