मराठीत ‘टकाटक’चा नवा ट्रेंड, आयुष्मान खुरानाच्या आर्टिकल 15 ला देतोय टक्कर

मराठीत ‘टकाटक’चा नवा ट्रेंड, आयुष्मान खुरानाच्या आर्टिकल 15 ला देतोय टक्कर

मराठीत प्रथमच सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आल्यानं ‘टकाटक’ सिनेमाबद्दल कुतूहल असल्याचं दिसत होतं.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै- दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा ‘टकाटक’ हा मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड आणणारा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. मराठीत प्रथमच सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आल्यानं ‘टकाटक’ सिनेमाबद्दल कुतूहल असल्याचं दिसत होतं. २८ जून रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फर्स्ट शोपासूनच प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. सिनेमाला महाराष्ट्रभर तुफान रिस्पॉन्स मिळत असून अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 3 कोटी 5 लाखांचा गल्ला जमवला आहे.

Saaho मधील 'द सायको सैयां' गाण्याचा पहिला लुक व्हायरल, प्रभासवरून हटत नाही नजर

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि. व व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. विशेषतः तरुणाईनं या चित्रपटाला ‘टकाटक’ रिस्पाँस दिला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आलेला नवा ट्रेंड आवडल्याची जणू पोचपावतीच त्यांनी दिली आहे.

Bigg Boss Marathi 2- माझे आई बाबा माझ्यासाठी ओझं नाही- रुपाली भोसले

चित्रपटाची भाषा जरी बोल्ड असली तरी त्यातील कंटेंट खूप महत्त्वाचा असल्याचं तरुणाईचं म्हणणं आहे. मुळात ‘टकाटक’चं बोल्ड असणं ही कथेचीच गरज असून, यातील भाषा, शैली आणि एकूणच वातावरण युथफुल असल्याचंही कॉलेज वर्गातील प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा चित्रपट वरकरणी जरी बोल्ड वाटत असला तरी यात धमाल, मजा, मस्ती आहे. आज आपल्या आजूबाजूला काय घडत आहे... कशा प्रकारचं वातावरण आहे... त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. नेमकी याचं अचूक चित्रण ‘टकाटक’मध्ये पाहायला मिळत असल्याचं तरुणींचं म्हणणं आहे, त्यामुळे एकूणच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक परीपूर्ण पॅकेजच असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Bottle Cap Challenge- Akshay Kumarने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण VideoViral

प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री या मुख्य भूमिकेतील जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावत आहे. अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या आणखी एका नव्या कोऱ्या जोडीची धम्मालही अनुभवायला मिळते. त्यांच्या जोडीला भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी दमदार कलाकारांच्या अभिनयाची फोडणी ‘टकाटक’ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मिलिंद कवडे यांची दिग्दर्शनशैली खूप वेगळी असून, टकाटक पाहताना पुन्हा एकदा त्याची प्रचिती येते. चित्रपटातील गाणी तसेच संवाद बोल्ड असले तरी अर्थपूर्ण आहेत.

सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, असं केलं प्रपोज

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

First published: July 4, 2019, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading