मुंबई, 04 डिसेंबर : अनेकदा अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडतात. काहींचे एमएमस, आक्षेपार्ह व्हिडीओ लीक होतात तर काहींचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल होतात. तर काही अभिनेत्रींना न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार घडतो. असाच काही प्रकार सध्या एका मराठी अभिनेत्रींसोबत घडला आहे. तिने स्वतः व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. काय घडलं आहे या अभिनेत्रीसोबत नक्की पाहा
'टकाटक २' या गाजलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्री कोमल बोडखे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 'टकाटक २' या चित्रपटात तिने अंकिता हे पात्र साकारले होते. आता कोमल सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ती सायबर क्राईमची बळी ठरली आहे. तिला काही नंबरवरुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली जात आहे. याबद्दल कोमलने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोमलने सोशल मीडियावर तिच्या सोबत घडलेल्या प्रकारची माहिती देत चाहत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा - Shiv Thakare : अन् बिग बॉसचं घर गाजवणारा शिव ठाकरे ढसाढसा रडायला लागला; काय झालं नक्की?
या व्हिडिओमध्ये ती म्हणाली कि, ''गेल्या काही दिवसांपासून मला एका नंबरवरून फोन येत होते. पण अनोळखी नंबर असल्याने मी तो फोन उचलला नाही. त्यानंतर मग त्यांनी माझ्या भावाला फोन केला. मला माझ्या भावाने मला फोन करून विचारलं की तू कोणत्या अँपवरून पैसे घेतले आहेस का? मी त्याला नाही असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला की ते लोक तू घेतलेल्या पैशाची मागणी करत आहेत. तसेच ते व्याजही मागत आहे. यावेळी सुरुवातीला मी घाबरले. मग मी त्या नंबरवर फोन केला आणि कोणतंही कर्ज घेतलं नसल्याचे स्पष्ट केले.''
View this post on Instagram
''मी इतकं सर्व सांगितल्यानंतरही ते थांबले नाही. त्यांनी मला माझ्या आधारकार्डचे डिटेल पाठवले. तसेच जर पैसे भरले नाहीत तर तुमचे न्यूड फोटो व्हायरल करु अशी धमकी दिली. मग मात्र मी आणखी घाबरले. मी माझ्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मला अकाउंट चेक करायला सांगितलं. मी चेक केल्यावर माझ्या एका खात्यात २ हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आल्याचं मला कळालं. पण मी कोणत्याही अँपवरून लोन घेतलंच नव्हतं. शेवटी मी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.''
गेल्या काही दिवसांपासून हे असे प्रकार इथे सर्रास सुरू आहेत. त्यामुळे कृपया असे कोणतेही अँप डाऊनलोड करु नका. यामुळे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स त्यांच्याकडे जातील आणि ते लोक याचा गैरफायदा घेतील. तुमची अशी फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहा, असेही आवाहन तिने याद्वारे केले आहे.
दरम्यान कोमल बोडके ही टकाटक या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटात तिने अंकिता हे पात्र साकारले होते. या पात्रामुळे ती घराघरात पोहोचली. 'टकाटक २' या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत तसेच किरण माने हे कलाकारही झळकले होते. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment