मुंबई, 19 जून : अभिनेता आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचं नाव मागच्या एक वर्षांत सातत्यानं चर्चेत आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीपणे मात करत करणारी ताहिरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. कॅन्सरवर उपचार सुरू असताना ताहिरानं आपला संपूर्ण प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांशी शेअर केला. सध्या ताहिरा कॅन्सरविषयी जनजागृती करत असून यासंबंधीत काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र त्यातील एक फोटो सध्या सगळीकडे वादाचा कारण बनला आहे. यामुळे ताहिरावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
रोशन कुटुंबीयांच्या वादात नवा ट्विस्ट, कंगनाच्या बहिणीचा हृतिकवर गंभीर आरोप
ताहिरा कश्यपनं गौतम बुद्धांच्या पुतळ्यावर बसून काढलेला एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोवरुन ताहिरावर नेटकऱ्यानी जोरदार टीका केली आहे. ध्यानस्थ गौतम बुद्धांच्या पुतळ्यावर बसून अशा प्रकारचा फोटो काढण बुद्धांचा अपमान केल्यासारखं असल्यानं ताहिरा आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका युजरन लिहिलं, तिनं दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला हवा तर दुसऱ्या युजरनं सुशिक्षित लोकांनी अशाप्रकारे वागणं खरंच लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
कपड्यांमुळे प्रियांकाच्या चोप्रा झाली ट्रोल, नेटकरी म्हणतात हा तर RSS स्वॅग
दरम्यान ताहिराला जेव्हा तिच्या पोस्टमुळे लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचल्याचं समजलं तेव्हा तिनं सर्वांची माफी मागितली. तिनं लिहिलं, ‘मी कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचवू इच्छित नाही. जर असं माझ्याकडून झालं असेल तर मी सर्वांची माफी मागते. प्रत्येक धर्माबाबत मला प्रेम आहे.’ यानंतर तिनं तो फोटोसुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवरून डिलिट केला आहे. मात्र तो पर्यंत हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला होता.
या स्टार कपलने ४० दिवस साजरं केलं हनिमून, प्रेग्नंसीच्या प्रश्नावर दिलं उत्तर
=================================================================
VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?