मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tabu : अबब! तरुण दिसण्यासाठी तब्बूने खरेदी केली होती महागडी क्रीम; किंमत वाचून बसेल धक्का

Tabu : अबब! तरुण दिसण्यासाठी तब्बूने खरेदी केली होती महागडी क्रीम; किंमत वाचून बसेल धक्का

tabu

tabu

नुकताच तब्बूने सुंदरता मिळवण्यासाठी काय केले होते याचा खुलासा केला आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई,  23 सप्टेंबर:  बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ही चिरतरुण अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने आजही ती चाहत्यांना घायाळ करते. वयाच्या 51 व्या वर्षीही तब्बूचे चाहत्यांना आकर्षण कायम आहे.  तिने चित्रपटसृष्टीत 30 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. पण इतक्या वर्षांनी सुद्धा तीचा उत्साह एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असाच आहे.  ती सुंदर दिसण्यासाठी काही विशेष करत नाही. पण नुकताच तिने सुंदरता मिळवण्यासाठी काय केले होते याचा खुलासा केला आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. प्रत्येकजण स्मार्ट आणि तरूण दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. चित्रपटसृष्टीत तर ही गोष्ट सर्रास दिसून येते. अनेक अभिनेत्या चाळीशी पार केल्यानंतर देखील विशीतल्या दिसतात. तरूण दिसण्यासाठी त्या खूप मेहनत घेतात. यामध्ये स्टार अभिनेत्री तब्बूचा देखील समावेश आहे.  अशातच आता एका इंटरव्यूमध्ये तब्बूने मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितलय कि, एकदा तिने एका  मेकअप आर्टिस्टच्या सांगण्यावरून ५० हजार किमतीची क्रीम खरेदी केली होती. हेही वाचा - Amruta Khanvilkar : देवदासची चंद्रमुखी अधिक मोहक कि दौलतरावांची; अमृताचा हा लुक पाहून तुम्हीच ठरवा ऐकून तुम्हाला धक्का बसला ना. पण हा खुलासा इतर कोणी नाही तर खुद्द अभिनेत्रीनेच केला आहे. एका मुलाखतीत  जेव्हा तब्बूला तिच्या सौंदर्याचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा तिने हि गोष्ट  सांगितली आहे. फिल्म कॅम्पेनियनसोबत झालेल्या मुलाखतीमध्ये तब्बूने तिच्या सौंदर्याविषयी खुलासा केला आहे. तब्बूला दिवसेंदिवस तरूण दिसण्याचं सिक्रेट विचारण्यात आलं.
View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

तेव्हा  तिने मेकअप आर्टिस्टचा किस्सा सांगितला. ती म्हणाली कि, 'माझ्या मेकअप आर्टिस्टने मला विचारलं होतं की, मॅम तुमची त्वचा खुप चांगली दिसत आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी काय करता?, त्यावर मी काही खास नाही, असं उत्तर दिलं. त्यावर तिने कोणती तरी क्रिम वापरण्याचा सल्ला दिला. मेकअप आर्टिस्टने सुचवलेल्या क्रिमची किंमत 50 हजार होती. फक्त एकवेळा मी खरेदी केली. त्यानंतर कधीच नाही' असं तब्बू म्हणाली. दरम्यान, 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बू प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. भूल भुलैया २ या चित्रपटात तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिने अंजुलिका आणि मंजुलिका या जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. पण तब्बू चांगलाच भाव खाऊन गेली. त्यानंतर आता 'खुफिया' नावाच्या चित्रपटात तब्बू काम करत आहे.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment

पुढील बातम्या