नवी दिल्ली, 16 डिसेंबर : प्रसिद्ध सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोनं गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य केलंय. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही TMKOC च्या 'बबिता जी'च्या मागे वेडेपिसे झाले आहेत. दरम्यान, ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोक तिला ओळखूही शकले नाहीत.
बबिता बनली बार्बी
अभिनेत्री मुनमुन दत्ताचे (Munmun Dutta) सोशल मीडिया प्रेम सर्वांनाच माहीत आहे. ती दररोज सोशल मीडियावर काहीना-काही शेअर करत असते, तिचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. आता मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. यामध्ये ती तिच्या बार्बी डॉल लूकमध्ये भन्नाट दिसत आहे.
View this post on Instagram
या गाण्यावर परफॉर्मन्स
या व्हिडिओमध्ये मुनमुनने चेहऱ्यावर कार्टून फिल्टर लावलाय. तिचे डोळे मोठे आहेत आणि तिचा चेहरा बार्बी गर्लसारखा दिसतोय. ती 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाणे 'आय एम अ बार्बी गर्ल' वर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशी कमेंट केल्या आहेत. एकानं म्हटलंय की, फिल्टर न लावताही मुनमुन बाहुलीसारखीच दिसते, तिला फिल्टर गरज नाही. तर काही युजरनी तिला चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेबद्दल विचारलं.
हे वाचा - घरामध्ये या गोष्टींचा करा धूर, कोरोना विषाणूही राहील दूर; AYUSH मंत्रालयाने दिली ही माहिती
मुनमुन दत्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर इतकी लोकप्रिय आहे की तिची प्रत्येक पोस्ट समोर येताच व्हायरल होते. शोमधील तिच्या भूमिकेतून ती सतत लोकांचे मनोरंजन करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.