मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Taarak Mehta..' थांबणार नाही, असित मोदींच्या टोल्यानंतर शैलेश लोढांची 'ती' पोस्ट चर्चेत

'Taarak Mehta..' थांबणार नाही, असित मोदींच्या टोल्यानंतर शैलेश लोढांची 'ती' पोस्ट चर्चेत

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 10 ऑगस्ट-  'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका आणि यातील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम केलं आहे. त्यांच्या ज्याची जागी इतर कलाकारांची वर्णी लागली आहे.मालिका सोडणाऱ्यांच्या यादीत अभिनेता शैलेश लोढा यांच्या नावाचादेखील समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, कलाकारांनी शो सोडल्यानंतर निर्माता असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोणाच्या जाण्याने हा शो थांबणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कलाकार आणि निर्मात्यांमध्ये नेमकं काय बिनसलंय याची सर्वानांच चिंता लागून आहे. दरम्यान असित मोदी यांनी मालिकेत तारक मेहता येणार असल्याचं सांगितलं होतं. जुने आले तर चांगली गोष्ट आहे. अन्यथा त्यानंतरही शो थांबणार नाही. असित मोदींच्या या कमेंटनंतर आता शोमध्ये तारक मेहताची मुख्य भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांची एक गूढ पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नसलं, तरी त्यांची मनास्थिती नक्कीच सांगितली आहे. (हे वाचा:राकेश-शमिताच्या ब्रेकअपसाठी अभिनेत्याची EX-पत्नी जबाबदार? रिद्धी डोगराने नेटकऱ्यांना दिलं रोखठोक उत्तर ) वास्तविक शैलेश यांनी आपला एक फोटो शेअर करत हिंदीमध्ये एक खोल विचार अर्थातच एक कोट लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहलंय, '‘तेरे मेरे रिश्ते का यही एक हिसाब रहा, मैं दिल ही दिल रहा, तू सदा दिमाग रहा. #शैलेश की शैली.’ यावरुन अभिनेत्याने हि शायरी असित मोदींना उत्तर देण्यासाठी लिहल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

पुढील बातम्या