मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहतामध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पाहा काय म्हणाली सुनैना फौजदार

तारक मेहतामध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पाहा काय म्हणाली सुनैना फौजदार

अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) अंजलीची भूमिका साकारत आहे. मात्र, नेहा मेहताला अंजली मेहताच्या भूमिकेसाठी पुन्हा मालिकेत परतायचं असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेवर स्वत: सुनैनानं प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) अंजलीची भूमिका साकारत आहे. मात्र, नेहा मेहताला अंजली मेहताच्या भूमिकेसाठी पुन्हा मालिकेत परतायचं असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेवर स्वत: सुनैनानं प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) अंजलीची भूमिका साकारत आहे. मात्र, नेहा मेहताला अंजली मेहताच्या भूमिकेसाठी पुन्हा मालिकेत परतायचं असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेवर स्वत: सुनैनानं प्रतिक्रिया दिली.

मुंबई 6 मे: टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (tarak mehta ka ultah chashma)गेल्या 13 वर्षांपासून भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करतीए. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. यातील 'गोकुलधाम सोसायटी' आणि तिथं राहणारी कुटुंब लोकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य खुलवतात. 13 वर्षांच्या या प्रवासात या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यांच्या जागी नवीन कलाकार आले मात्र, मालिका अखंड सुरू आहे. गेल्या वर्षी या मालिकेतील अंजली मेहताची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने (Neha Mehta) मालिकेला रामराम ठोकला.  त्यानंतर अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) अंजलीची भूमिका साकारत आहे. मात्र, नेहा मेहताला अंजली मेहताच्या भूमिकेसाठी पुन्हा मालिकेत परतायचं असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेवर स्वत: सुनैनानं प्रतिक्रिया दिली.

अलिकडेच तिनं  बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं तारक मेहता या मालिकेतील नेहाच्या पुनरागमनावरही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,  "मला याबद्दल काहीच माहिती नाही. गेल्या 8 महिन्यांपासून मी अंजलीचा रोल करत आहे. जर नेहा मेहताला मालिकेत परतायचं असेल तर त्याबद्दलचा निर्णय मालिकेचे निर्माते असित मोदी यांचा असेल. मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही.

राखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण

दरम्यान, सुनैनाची मालिकेत एंट्री झाल्यापासून अनेक चाहते तिच्या अक्टिंगसह लूकवर कमेंट करत आहेत. तसेच नेहा आणि सुनैना या दोघींचा फॅशन सेन्स, स्टायलिंग इतकं हुबेहुब कसं असू शकतं याबद्दलही प्रश्न विचारत आहेत. त्यावर सुनैना म्हणते, की "मालिकेच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयांवर माझं कोणतंच नियंत्रण नाही. जो रोल मला दिला गेलाय तो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न करते."

"कपड्यांपासून ते स्टायलिंगपर्यंतचा संपूर्ण निर्णय क्रिएटीव्ह टीमचा असतो. मला माहितीए की, लोकांना या कॅरेक्टरसाठी माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मालिकेच्या निर्मात्यांच्या मनात एखाद्या कॅरेक्टरबद्दल एक विशिष्ट प्रतिमा असते. त्यामुळं त्या कॅरेक्टरमध्ये मी स्वत: बदल घडवून आणणं चुकीचं आहे. मी प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मी तेच करते आहे जे मला चांगलं वाटतंय."

काही दिवसांपूर्वीच काही नेटकऱ्यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचं स्टँडर्ड घसरलं असल्याची टीका केली होती. त्यानंतर दिग्दर्शक मालव राजदा यांनी त्यांना रिप्लाय देत तुमच्या प्रतिक्रियेची दखल घेतलीय, असं उत्तर दिलं होतं.

नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ही जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारी कॉमेडी मालिका ठरली असून यातील बहुतांश कलाकारांची नावे भारतात आणि इतर अनेक देशात घरोघरी पोहचली आहेत. 2008 मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला TMKOC 13 व्या वर्षातही सुरू आहे आणि या कालावधीत त्याचे 3100हून अधिक एपिसोड प्रक्षेपित झाले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma