मुंबई, 23 ऑगस्ट : तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेत सध्या नवे नवे ट्रॅक येत आहेत. काही अभिनेते मालिका सोडून जाण्याचं वृत्त आहे तर काही नव्या चेहऱ्यांची एंट्री या मालिकेत होणार आहे. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काही व्यक्तिरेखांसाठी अनेक दिवसांपासून ऑडिशन सुरू होत्या. त्यातून गेल्याच महिन्यात नव्या दयाबेनची निवड झाली. आता मालिकेत सोनू परतणार असा ट्रॅक येणार आहे.
tarak mehta ka ooltah chashmah मध्ये सोनू म्हणजे सोनालिका भिडेचा ट्रॅक येणार असल्याने नवा चेहरा मालिकेत दिसणार आहे. निधी भानूशाली सोनूची भूमिका करत होती. पण मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निधीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मालिका सोडल्याने आता नव्या सोनूचा शोध सुरू होता.
पलक सिधवानी ही अभिनेत्री तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये दिसणार आहे.
हे वाचा - 'उरी'नंतर आता बालाकोटवर होणार सिनेमाची निर्मिती, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत
जाहिरातींमध्ये यापूर्वी हा चेहरा दिसला होता. शिवाय पलकने काही माहितीपटही केले आहेत.
सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीच्या रिप्लेसमेंटवरून गेल्या महिन्यात बऱ्याच बातम्या आल्या होत्या. मानधनावरून कुरबुरी सुरू असल्याचं म्हटलं जात होतं.
वाचा : नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या रानूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं
VIDEO: भाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा