तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिताचं काम करणाऱ्या मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) टप्पूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला असा प्रश्न विचारला की, त्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.
मुंबई, 24 नोव्हेंबर: तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतल्या जेठलालपासून ते बबितापर्यंत सर्वच पत्रांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हे कलाकार तारक मेहतासोबतच त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता तारक मेहता का उल्टा चश्माच्या नव्या टप्पूचंच उदाहरण घ्या ना. टप्पूची भूमिका करणाऱ्या राज अनादकट (Raj Anadkat) ने स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलवर मालिकेत बबिताजीचं काम करणाऱ्या मुनमुन दत्तानेही (Munmun Dutta) कॉमेंट केली आहे.
त्याचं झालं असं की, राज अनादकट आपल्या यूट्यूब चॅनलवरुन प्रेक्षकांशी संवाद साधत होता. प्रेक्षकांनी कॉमेंट्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देत होता. त्यावेळी मुनमुन दत्ताने त्याच्या यूट्यूब चॅनलवर कॉमेंट केली, ‘कमाल है जी. कमाल हैं जी. वैसे कितना कमा लेते हो?’ पण तिच्या या प्रश्नावर राज क्लीन बोल्ड झाला. अख्या जगाच्याच्या समोर हे उत्तर कसं कसं द्यायचं असा त्याला प्रश्न पडला. अद्यापही तिच्या प्रश्नाला राजने उत्तर दिलेलं नाही.
मुनमुनने विचारलेला हा प्रश्न काही दिवसांपूर्वी राजला त्याच्या काही इतर चाहत्यांनी विचारला होता. त्या कॉमेंट्सकडेही त्याने असंच दुर्लक्ष केलं होतं. मुनमुनने विचारलेल्या प्रश्नावर आता राज टप्पू स्टाईल गंम्मत करणार का? तिलाही एखादा भन्नाट प्रश्न विचारुन चक्रावून सोडणार का? असा प्रश्न त्याच्या पडला आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.