मुंबई, 29 मार्च- सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्ट चश्मा’चे चाहते ‘टप्पू की मम्मी’ आणि ‘सोसायटीची जान’ दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीला पाहू शकत नाही. २०१७ पासून मॅटर्निटी लीववर गेलेल्या दिशाने मालिकेत पुन्हा न येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्मात्यांनी दिशाला मालिकेत परत येण्याचं अल्टिमेटम दिलं. जर ती मालिकेत परत आली नाही तर तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात येण्याबद्दलही ते बोलले.
मालिकेच्या निर्मात्यांनी दिशाला ३० दिवसांची नोटीसही पाठवली असल्याची बातमी समोर येत आहे. यावर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, ‘मालिकेच्या संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासूनच फार सहकार्य केलं आहे. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरही आम्ही फार वेळ वाट पाहिली. एका आईला आणि तिच्या मुलीला आम्ही पूर्ण वेळ देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. पण प्रेक्षकांच्या आवडत्या शोकडेही दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.'
दयाबेन ही व्यक्तिरेखा मालिकेत असणं फार आवश्यक आहे. अशात जर दिशा परत येत नाही तर आम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागेल.’ नोटीसबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, त्यांच्याकडून अशी कोणत्याही प्रकारची नोटीस गेलेली नाही. त्यामुळे दयाबेन अर्थान दिशा लवकरच मालिकेत परतेल अशी अपेक्षा मालिकेच्या चाहत्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, दिशाने ३० नोव्हेंबर २०१७ ला मुलीला जन्म दिला. यानंतर काही महिन्यात दिशा कमबॅक करेल असं वाटलं होतं. पण तिने मार्च २०१८ पर्यंत सुट्टी वाढवून घेतली. या दरम्यान मालिकेच्या संपूर्ण टीमने तिच्या सवडीनुसार घरी जाऊन काही सीन शूट केले आणि फिलर म्हणून त्याचा वापर केला. दिशा आणि निर्मात्यांमध्ये तिच्या कमबॅकबद्दल चर्चा व्हायच्या पण त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही.
VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया