Home /News /entertainment /

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'पोपटलाल' साठी मोठा झटका, आता नाही राहिला पत्रकार?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील 'पोपटलाल' साठी मोठा झटका, आता नाही राहिला पत्रकार?

गोकुळधाम सोसायटी ही दर वेळी काही नवीन ट्विस्टमुळे चर्चेत असतेच. दरवेळी सोसायटीतील कोणी ना कोणी तरी कशात ना कशात तरी फसतोच.

    मुंबई, 13 नोव्हेंबर : टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) पुन्हा एकदा जबरदस्त नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हल्लीच एका एपिसोडमध्ये जेठालालच्या स्वप्नात कोरोनासुर आल्यामुळे जेठालालने संपूर्ण सोसायटीभर त्याच्या बापूजींना काठी घेऊन पळवलं. ते पाहून सोसायटीत अगदीच धुमाकूळ उडाला. गोकुळधाम सोसायटी ही दर वेळी काही नवीन ट्विस्टमुळे चर्चेत असतेच. दरवेळी सोसायटीतील कोणी ना कोणी तरी कशात ना कशात तरी फसतोच. आताही गोकुळधाममध्ये एक भलताच नवीन ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या तुफान एक्सप्रेस वृत्तपत्रातील गोल्डन ग्लोब अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार 'पोपटलाल'शी संबंधित आहे. इथं असं काही घडलंय की गोकुळधामचे लोक पोपटलालचं कसं व्हायचं या चिंतेत पडले आहेत. पोपटला कशी मदत करावी, कसं शांत करावं हे कोणालाही कळत नाही. शोच्या पुढच्या भागांमध्ये आपण हे पाहू शकता की इतके महिने लॉकडाउनमुळे घरी राहिल्यानंतर अखेरीस एका संध्याकाळी सोसायटीतील सर्व पुरुषमंडळी निर्णय घेतात की दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व जण एकत्र कामावर जाण्यासाठी निघतील. पण सकाळी निघायच्या वेळी पोपटलाल जो आपल्या कामावर जाण्यासाठी आधीच अतिउत्साही होता, तो अचानक गायब झाला. वाचा-सुंदरा मनामध्ये भरली: दिवाळीनिमित्त प्राजक्ता माळीचं ग्लॅमरस PHOTOSHOOT पोपटलाल अखेरीस सोसायटीच्या सदस्यांना सापडतो, परंतु भेटल्यावर तो जे काही सांगतो, ते सर्वांच्या चिंतेचं कारण बनतं. चेहऱ्यावरून अतिशय वैतागलेला पोपटलाल सर्वांना असं सांगतो की त्याच्या ऑफिसने त्याला काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता तो तुफान एक्स्प्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार राहिला नाही. हे ऐकून सोसायटीचे सर्व सदस्य शांत होतात. मग ते सर्व हळूहळू पोपटलालचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांना वाटतं की नोकरी गेल्यामुळे पोपटलालला खूप दु:ख झालं असेल कारण ती त्याच्यासाठी केळळ नोकरीच नव्हती तर त्याच्यासाठी स्वाभिमानाची बाबही होती. वाचा-प्रसिद्ध कोरिओग्राफर दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? भाचीसोबत रिलेशनच्या चर्चा इतकंच नाही तर पोपटलाल निराश होऊन असं जाहीर करतो की तो सगळं सोडून कुठेतरी निघून जाईल. पोपटलालची व्यथा सोसायटीतील प्रत्येकजणाला कळते की नोकरी गमावणं हा पोपटलालला मोठा धक्का आहे आणि पोपटलालला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पण आता पुढे काय होईल हे शोच्या येणाऱ्या भागांमधून कळेल. पोपटलालची नोकरी वाचते, की तो सोसायटी सोडून निघून जातो. जाणून घ्या येणाऱ्या भागांमध्ये.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Taarak mehta ka ooltah chashma

    पुढील बातम्या