'तारक मेहता...'ची सोनू रिअल लाइफमध्ये करतेय गोलीला डेट? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

'तारक मेहता...'ची सोनू रिअल लाइफमध्ये करतेय गोलीला डेट? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

'तारक मेहता...'मध्ये सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी व गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मागच्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी एकदम मनोरंजक आहे. या मालिकेत प्रत्येक पात्राची स्वतःची वेगळी ओळख आहे आणि या मालिकेतला प्रत्येक कलाकार आपापल्या भूमिकेची प्रेक्षकांवर आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे. पण सध्या या मालिकेतील सोनू आणि गोली हे दोन्ही कलाकार रिअल लाइफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

'तारक मेहता...' मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मग ते लहान असो किंवा मोठे. या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन चांगली गट्टी जमली आहे. त्यातच मालिकेत भिडे व माधवी यांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी व गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रितेश देशमुखनं केली सलमान खानची नक्कल, व्हायरल झाला Tik Tok Video

पलकनं नुकताच चाहत्यांशी लाइव्ह सेशन ठेवलं होतं ज्यात तिला तू कुशला रिअल लाइफमध्ये डेट करत आहेस का असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र याला स्पष्ट नकार देत कुश केवळ माझा चांगला मित्र आहे असंही तिनं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Badhiya!

A post shared by Kush (@_kushah) on

मालिकेतील टप्पूसेना प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. या टप्पूसेनेमध्ये ऑफस्क्रीनसुद्धा चांगली मैत्री आहे. याआधी सोनूची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. आता निधीची जागा पलकने घेतली आहे. पलकने पहिल्यांदाच मालिकेत भूमिका साकारली आहे. याआधी ती जाहिरातींमध्ये झळकली होती. तर कुश शाहनं 'डॉक्टर हाथी' यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारत आहे.

'महाभारत'च्या स्टारकास्ट मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही

अरजित सिंहची छोटीशी चूक आणि भाईजानशी दुश्मनी, काय आहे दोघांमधील भांडणाचं कारण

First published: April 25, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या