Home /News /entertainment /

Taarak Mehta मध्ये झाली नव्या नट्टू काकांची एन्ट्री; समोर आली पहिली झलक

Taarak Mehta मध्ये झाली नव्या नट्टू काकांची एन्ट्री; समोर आली पहिली झलक

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय मालिका बनली आहे. सोबतच या मालिकेतील प्रत्येक कलाकार तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे नट्टू काका होय.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून-   'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय मालिका बनली आहे. सोबतच या मालिकेतील प्रत्येक कलाकार तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे नट्टू काका होय. या मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणाऱ्या नट्टू काकांची भूमिका अभिनेता घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांनी साकारली साकारली होती. मात्र घनश्याम नायक आता या जगात नाहीत. अभिनेते घनश्याम नायक यांचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यांच्या जाण्यानंतर या मालिकेत त्या भूमिकेमध्ये आजपर्यंत एकही नवा अभिनेता दिसला नव्हता. प्रेक्षक नट्टू काकांना प्रचंड मिस करत होते. पण आता या मालिकेत नवीन नट्टू काकांची एन्ट्री झाली आहे. निर्माता असित मोदीने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी नवीन नट्टू काकांची ओळख करून दिली आहे. असित कुमार मोदी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'जुन्या नट्टू काकांनी नवीन नट्टू काकांना पाठवलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना तुमचं अफाट प्रेम दिलंय, त्याचप्रमाणे नवीन नट्टू काकांनाही भरभरून प्रेम द्या. मात्र, असित कुमार मोदी यांनी नवीन नट्टू काकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अद्यापही उघड केलेलं नाहीय. (हे वाचा:तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यावर भडकला करण कुंद्रा;'तो' मेसेज ठरला कारणीभूत ) जुने नट्टू काका म्हणजेच घनश्याम यांना मागील वर्षी कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर किमोथेरपी केली जात होती याबद्दल त्यांच्या मुलगा विकास याने माहिती दिली होती.' मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचं गळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं होतं. घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका साकारत होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

    पुढील बातम्या