‘Tarak Mehta Ka Oolta Chashma’ला मिळाली नवी दयाबेन? अभिनेत्रीनं केला खुलासा

‘Tarak Mehta Ka Oolta Chashma’ला मिळाली नवी दयाबेन? अभिनेत्रीनं केला खुलासा

अनेक मीडिया रिपोर्टमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचाही दावा केला जात होता. एवढंच नाही तर या अभिनेत्रीचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय शोचे प्रेक्षक बऱ्याच काळापासून दयाबेनच्या परतण्याची वाट पाहत आहेत. मध्यंतरी अभिनेत्री दिशा वकानी या शोमध्ये कमबॅक करण्यार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता या मालिकेतील दिशा वकानीची जागा दुसऱ्या एका अभिनेत्रीनं घेतली असून लवकरच या मालिकेत नव्या दयाबेनची एंट्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं. या मालिकेत आता नव्या अभिनेत्रीची निवड झाल्याचं म्हटलं जात होतं. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचाही दावा केला जात होता. एवढंच नाही तर या अभिनेत्रीचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

मुलगा अरहान आणि पूर्व पती अरबाज बाबत मलायका म्हणते...

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री विभूती शर्मा दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहे असं म्हटलं जात होतं. विभूतीनं या अगोदर ‘बडे अच्छे लगते है’ आणि ‘हमने ली है शपथ’ या सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. जुनी दयाबेन म्हणजे दिशा वकानी या शोमध्ये परतण्याच्या शक्यता संपल्यावर शोच्या निर्मात्यांनी नव्या अभिनेत्रीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी ऑडिशन सुद्धा सुरू होत्या. मात्र कोणत्याही अभिनेत्रीचं नाव फायनल झालं नव्हतं. त्यानंतर आता या शोमध्ये अभिनेत्री विभूती दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र विभूतीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ती हा शो करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रिसेप्शन पार्टीमध्ये सुंदर दिसत होती खासदार नुसरत जहां, पाहा PHOTO

 

View this post on Instagram

 

I am not doing the show. (Please ignore the rumours) #pinkvilla . #tmkoc

A post shared by Vibhoutee Sharma (@vibhouteesharmaofficial) on

काही मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, दिशा वकानीच्या जागी विभूती शर्मा दिसू शकते. यासाठी विभूतीनं मॉक शूट सुद्धा केलं आहे. ज्यात ती दिशा वकानीसारखी दिसत आहे असं म्हटलं जात होतं. मात्र विभूतीनं या शोचं कोणतही कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं नाही.

...म्हणून मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही

दिशा वकानी प्रेग्नंसी लीव्हमुळे 2017 पासून या शोमधून बाहेर आहे. त्यानंतर तिनं या शोमध्ये परत येण्यासाठी मोठी रक्कम मागितली. तसेच या कॉन्ट्रॅक्टमध्ये तिला काही नव्या टर्म्स जोडायच्या होत्या. मात्र याला निर्माता असित मोदी यांनी नकार दिला. तेव्हा पासून या शोचे निर्माता नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यानंतर अनेक अभिनेत्रींची नावं या भूमिकेसाठी चर्चेत आली होती.

====================================================================

SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 11:31 AM IST

ताज्या बातम्या