9 महिन्याच्या ब्रेकनंतर नट्टू काकांचा कमबॅक; म्हणाले, "तारक मेहताच्या सेटवरच अखेरचा...."

9 महिन्याच्या ब्रेकनंतर नट्टू काकांचा कमबॅक; म्हणाले,

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील नट्टू काका (Nattu Kaka) 9 महिन्याच्या ब्रेकनंतर मालिकेत पुन्हा दिसणार आहेत. त्यांच्यावर मोठी सर्जरी झाली होती.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर: तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सेठजी मेरी पगार कब बढाओगें हे वाक्य ऐकायला मिळणार आहे. मालिकेत लवकरच नट्टू काका (Nattu Kaka) अर्थातच घनश्याम नायक (Ghanashyam Nayak) यांची एन्ट्री होणार आहे. एक - दोन दिवसांतच ते मालिकेत पुन्हा दिसणार आहेत. 'शूटिंगला पुन्हा सुरुवात करण्यासाठी मी फारच एक्सायटेड होतो' असं घनश्याम यांनी सांगितलं. तसंच तारक मेहताच्या सेटवर त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याचीही त्यांनी माहिती दिली. बग्गा आणि जेठालाल यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीचा सीन शूट केला.

गेल्या 9 महिन्यांपासून घनश्याम नायक या मालिकेपासून लांब होते. 16 डिसेंबरपासून त्यांनी तारक मेहताच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. घनश्याम नायक यांच्यावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांच्या तब्येत ठणठणीत असल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बातचित करताना त्यांनी सांगितलं, ‘मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहायचं आहे. तारक मेहताच्या सेटवर,  मेकअप केलेला असताना मला शेवटचा श्वास घ्यायचा आहे. हीच माझी शेवटची इच्छा आहे.’

घनश्याम नायक यांना आधी वेगळ्याच भूमिकेसाठी सीरिअलमध्ये घेण्यात आलं होतं. पण जेव्हा गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असणाऱ्या कलाकाराचा शोध सुरू झाला तेव्हा, दीलिप जोशी यांनी निर्मात्यांना घनश्याम नायक यांचं नाव सुचवलं. दीलिप जोशी यांनी असंही सांगितलं की, घनश्याम नट्टू काकांची भूमिका चांगली साकारू शकतील. मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनाही हा पर्याय आवडला. आणि नट्टू काकांच्या भूमिकेसाठी घनश्याम नायक यांचं नाव निश्चित झालं.

घनश्याम नायक यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला 1960 सालीच सुरुवात झाली होती. मासूम या चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घनश्याम नायक यांनी तेरे नाम, घातक, चायना गेट, बरसात, आंदोलन, खाकी, शिकारी, क्रांतिवीर, तिरंगा, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. हिंदीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये घनश्याम नायक यांनी नाव कमवलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 21, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या