मुंबई, 28 डिसेंबर : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो असलेल्या तारक मेहता का उल्टा चश्मानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शोमधील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मानावर राज्य केलंय. वेगवेगळ्या स्वभावाची आणि विचारांची माणसं एकाच शोमध्ये एकत्र दिसतात. दया बेन आणि जेठालाल प्रमाणेच शोमधील बबीता आणि अय्यर भाई यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सायटिस्ट असलेला अय्यर भाई आणि त्याची सर्वांहून सुंदर बायको. आपल्या बायकोवर अनेक जण प्रेम करतात हे माहिती असून अय्यर भाईचा वेगळात अँटिट्यूट पाहायला मिळत असतो. एक नवरा म्हणून अय्यर भाई ऑनस्क्रिन प्रेक्षकांना प्रचंड आवडतो पण आता अय्यर भाईला रिअल लाईफमध्येही कोणाचा तरी नवरा व्हायचं आहे. हो अय्यरची भूमिका साकारणारे अभिनेते तनुज महाशब्दे यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 42व्या वर्षी ते लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते तनुज महाशब्दे यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. ते 42वर्षांचे आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे चाहते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तनुज यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती दिलेली नाहीये पण 2023मध्ये ते लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जानेवारीच्या सुरूवातीलाच ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या रिअल लाइफ बबिताविषयी आणखी माहिती समोर आलेली नाहीये. पण चाहते अय्यर भाईच्या रिअल लाइफ बबिताला पाहण्यासाठी आतूर आहेत.
हेही वाचा - Salman Khan Birthday : सलमान खानला व्हायचंय बाप; म्हणाला, मुलं हवी पण मुलांची आई...
त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी अय्यर यांच्या लग्नाच्या चर्चांनंतर वेगळीच शंका उपस्थित केली आहे. लग्न केल्यानंतर अय्यर मालिकेतून ब्रेक घेणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच अभिनेते तनुजकडून त्यांच्या लग्नाची बातमी कळावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. काहींनी तर हे खरं आहे की अफवा आहेत असं म्हटलं आहे. तनुज यांनी पुढे येऊन याबद्दल सागांवं असं म्हटलंय.
अभिनेते तनुजची होणारी बायको कशी आहे याबद्दल माहिती समोर आलेली नाही. पण अय्यरची ऑफस्क्रिन बायको बबितापेक्षा हॉट आणि सुंदर आहे असं म्हटलं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून अय्यर एका मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. ते लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण या चर्चा खऱ्या ठरल्या असून अय्यर जानेवारीत लग्न करणार आहे. फक्त आता अय्यरनी स्वत: सांगणं बाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Tv actor