मुंबई,17 मे- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’
(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. गेली 14 वर्षे ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांनी
(actors) लोकांच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते शैलेश लोढा
(Shailesh Lodha) होय. या मालिकेत त्यांनी तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु त्यांच्या चाहत्यांसाठी एक नाराज करणारी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते शैलेश हा शो सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या मालिकेत शैलेश लोढा हे लेखक तारक मेहता यांची भूमिका साकारत आहेत. तारक मेहता व जेठालाल (Jethalal) यांची मालिकेमध्ये चांगली मैत्री दाखवण्यात आलीय. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. जेठालालवर आलेलं प्रत्येक संकट दूर करण्यासाठी तारक मेहता नेहमीच मदत करीत असतात. याच कारणामुळे या व्यक्तिरेखेलाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. गेल्या 14 वर्षांपासून शैलेश यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. परंतु या बातमीने त्यांच्या चाहत्यांना चकित केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शैलेश लोढा यांनी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी मालिकेचं शूटिंगसुद्धा बंद केलं आहे. गेल्या एक महिन्यापासून ते सेटवर आले नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ई टाइम्सच्या शैलेश लोढा यांनी स्वतः साठी विशेष अशा शोची निवड अजून केलेली नाहीय. त्यांना हवा तसा प्रोजेक्ट अजून मिळालेला नाही. त्यांनी मध्यंतरी अनेक ऑफर्स नाकारल्या आहेत. परंतु आता ते आपल्या हातात आलेली ऑफर्स सोसू शकत नाहीत. सोबतच असंदेखील म्हटलं जात आहे की, शैलेश हे आपल्या शोच्या मेकर्सवर नाराज आहेत आपल्या शूटिंग डेट्सचा योग्य वापर होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु याबाबत त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. त्यामुळे ते नक्की शो सोडणार की याशोमध्ये कायम दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार आणि त्यांचा दमदार अभिनय हे या मालिकेच्या लोकप्रियतेमागील एक मोठं कारण आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या पसंतीला उतरले आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढतच आहे. या मालिकेतील एक व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. परंतु दयाबेनच्या भूमिकेत दिसणारी दिशा वकानी आजही चाहत्यांची आवडती आहे. दिशा वकानी सध्या या मालिकेत दिसत नाहीय.मात्र तिच्या कोणत्याही अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलेलं नाहीय. त्यांनतर आता शैलेश यांच्या मालिका सोडण्याच्या बातमीने सर्वानांच निराश केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.