‘तारक मेहता’चं चित्रीकरण पुन्हा थांबणार? अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण
‘तारक मेहता’चं चित्रीकरण पुन्हा थांबणार? अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेत ‘सुंदरलाल’ (sundarlal) ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्यावर सध्या अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई 13 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मयुर वकानी (Mayur Vakani) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेत ‘सुंदरलाल’ (sundarlal) ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्यावर सध्या अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तारक मेहताचं शूटिंग संपवून मयुर अहमदाबादला परतला होता. टीव्ही 9 नं दिलेल्या वृत्तानुसार याच काळात त्याला कोरोनाची लागण झाली. दरम्यान अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मयुरला गेल्या दोन दिवसांपासून ताप येते होता. त्यामुळं त्यानं स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली. अन् या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी तारक मेहताचे निर्माता असिद मोदी आणि रिटा रिपोटर ही व्यक्तिरेखा साकारणारी प्रिया अहूजा राजदा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं मालिकेचं चित्रीकरण काहीसं लांबणीवर गेलं होतं.
अवश्य पाहा - चर्चा तर होणारच...; सायली संजीवची बोल्ड दृश्य सोशल मीडियावर व्हायरलमहाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.