Home /News /entertainment /

'Taarak Mehta..'मध्ये दयाबेनच नव्हे तर हे पात्रसुद्धा आहे गायब; तुम्हाला माहिती आहे का?

'Taarak Mehta..'मध्ये दयाबेनच नव्हे तर हे पात्रसुद्धा आहे गायब; तुम्हाला माहिती आहे का?

Taarak Mehta ka Ooltah Chashmah ही मालिका गेली 14 वर्षे लोकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कालाकाराशी प्रेक्षकांच एक खास नातं बनलं आहे.

    मुंबई, 5 जानेवारी-   छोट्या पडदयावर अशा अनेक मालिका आहेत ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Taarak Mehta ka Ooltah Chashmah)  होय. ही मालिका गेली 14 वर्षे लोकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कालाकाराशी प्रेक्षकांच एक खास नातं बनलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. त्यामुळेच मालिकेत एक जरी कलाकार दिसला नाही तर प्रेक्षकांना चुकल्यासारखं होतं. दयाबेन अर्थातच दिशा वकानी सध्या मालिकेत दिसत नाही त्यामुळे चाहते नाराज आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मालिकेतील आणखी एक पात्र सध्या मालिकेत दिसून येत नाही. आज आपण तिच्याविषयीच जाणून घेणार आहोत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका चाहत्यांना खळखळून हसवत आहे. चाहते दिवस-दिवसभर मालिका पाहात असतात. त्यांना अजिबात कंटाळा येत नाही. प्रेक्षकांना खासकरून जुने एपिसोड पाहायला फार आवडत. कारण त्यामध्ये सुरुवातीपासूनचे सर्व कलाकार पाहायला मिळतात. दयाबेन, जेठालाल, भिडे, सोडी, बबिता, टप्पू , पोपटलाल मालिकेतील अशा अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सतत त्यांना पाहू इच्छितात. परंतु यातील काही कलाकारांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तर काहींनी मालिका कायमची सोडली आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने आपल्या प्रेग्नेंसीसाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु आजही ती मालिकेत परतलेली नाहीय. तिने मालिकेतून ब्रेक घेऊन जवळजवळ सहा वर्षे होत आली आहेत. त्यामुळे चाहते तिला प्रचंड मिस करतात. मालिकेत आणखी एक पात्र आहे जे सध्या मालिकेत दिसत नाही. आणि चाहते तिला प्रचंड मिस करतात. ते पात्र म्हणजे 'बावरी'. बागाची लेडी लव्हर बावरी सध्या मालिकेत दिसत नाही. दयाबेन नव्हे तर बावरीसुद्धा मालिकेत दिसत नाही- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत जेठालालच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करणारा व्यक्ती म्हणून बागा हे पात्र दाखवण्यात आलं आहे. बागा आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने अनेकदा जेठालालसाठी अडचणी निर्माण करतो असं हे मजेशीर पात्र आहे. तर हा बागा एका मुलीच्या प्रेमात असतो आणि तिचं नाव बावरी असं असत. बावरी हे पात्रसुद्धा अतिशय मजेशीर होतं. परंतु गेली अनेक दिवस. खरं तर दोन वर्षांपासून बावरी या मालिकेत दिसलेलीच नाही. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडतो. ती नेमकं का दिसून येत नाही. चाहते बावरी आणि बागाच्या मजेशीर केमिस्ट्रीला मिस करतांना दिसून येतात. (हे वाचा:जेठालाल' सोडणार 'Taarak Mehta... मालिका? दिलीप जोशींनी स्वतः केला ... ) या कारणासाठी बावरीने सोडली मालिका- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत अभिनेत्री मोनिका भदौरियाने बावरीची भूमिका साकारली होती. सहाय्यक भूमिका असूनही चाहत्यांना ती फारच पसंत पडत होती. २०१३ पासून या मालिकेत मोनिका काम कट होती. परंतु तिने आपलं मानधन वाढवण्यात यावं अशी मागणी केली होती. परंतु मेकर्सनी तसं केलं नाही. या कारणामुळे मोनिकाने या मालिकेला रामराम केला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv serial

    पुढील बातम्या