News18 Lokmat

'तारक मेहता...'च्या चाहत्यांना बसणार धक्का; निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या निर्मात्यांनी दिशाला मालिकेत परतण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिल्याचं म्हटलं होतं

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 02:26 PM IST

'तारक मेहता...'च्या चाहत्यांना बसणार धक्का; निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई, 03 मार्च : सोनी टीव्ही वरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मागच्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे या मालिकेतील मुख्य पात्र दयाबेन. सप्टेंबर 2017 पासून मॅटर्निटी लिव्हवर असलेल्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानीनं या मालिकेत परतण्यासाठी मानधनाची रक्कम वाढवून मागितली. त्यानंतर दयाबेन ही मालिका सोडणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या निर्मात्यांनी दिशाला मालिकेत परतण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिल्याचं म्हटलं होतं मात्र आता ते दयाबेनची वाट जास्त दिवस पाहू शकत नाहीत. त्यामुळे निर्माता असित कुमार मोदी यांनी दयाबेनला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी 'बॉम्बे टाइम्स'शी बोलताना सांगितलं, 'आम्ही दिशाला मालिकेत परतण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ आता संपला आहे. त्यामुळे आम्ही तिची अजून जास्तवेळ वाट पाहू शकत नाही. मालिकेची कथा पुढे नेण्यासाठी आम्ही नव्या दयाबेनच्या शोधात आहोत.' त्यांच्या मते दिशानं या मालिकेत न परतण्याचं ठरवल्यानं आता तिची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. 22 मार्चला 'तारक मेहता...'च्या निर्मात्यांनी दिशानं 30 दिवसात मालिकेत परतण्यास सांगितलं होतं तसंच ती परत न आल्यास तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
Loading...

 

View this post on Instagram
 

Kya lagta hai aapko? Jethalal kar payenge Singapore mein 'Bungee Jumping'? Dekhte rahiye #TaarakMehtaKaOoltahChashma, Mon-Fri raat 8:30 baje, sirf Sony SAB par! #TMKOCInSingapore


A post shared by SAB TV (@sabtv) on

सूत्रांच्या माहितीनुसार मालिकेचे निर्माता असित मोदी आता मालिकेबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यांना ही मालिका पुढे न्यायची असल्यानं त्यांनी आता नव्या दयाबेनचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या लोकप्रिय चेहऱ्याला दयाबेनच्या भूमिकेसाठी निवडलं जाईल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आता प्रसिद्ध चेहऱ्यापेक्षा एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. मालिकेत परतणं किंवा न परतणं हा पूर्णतः दिशाचा निर्णय असेल. तसंच तिला तिच्या कुटुंबाला वेळ द्यायचा असेल तर मी याबाबत काही बोलू इच्छित नाही असं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत असित मोदी यांनी स्पष्ट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...