Home /News /entertainment /

'जेठालाल' आयुष्यात आला नसता तर...'तारक मेहता' फेम दिलीप जोशीनीं केला आश्चर्यकारक खुलासा

'जेठालाल' आयुष्यात आला नसता तर...'तारक मेहता' फेम दिलीप जोशीनीं केला आश्चर्यकारक खुलासा

जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) साकारतात. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण दिलीप यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन ( entertaining people) करत आहे. या मालिकेतल्या दया आणि जेठालाल (Daya and Jethalal) या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) साकारतात. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण दिलीप यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची ऑफर येण्यापूर्वी जोशी अभिनय क्षेत्र सोडण्याचा (leaving the acting field) विचार करत होते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आज घरोघरी लोकप्रिय आहे. या टीव्ही मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं प्रत्येक पात्र (character) प्रेक्षकांना खूप आवडतं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधलं महत्त्वाचं पात्र म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारलेला जेठालाल. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याची ऑफर येण्यापूर्वी दिलीप जोशी अभिनयाचे क्षेत्रच सोडणार होते. कारण या मालिकेची ऑफर येण्यापूर्वी दिलीप जोशी जवळपास एक वर्ष बेरोजगार होते.

VIDEO: सारा अली खानच्या बॉडीगार्डनं केलं असं काही... अभिनेत्रीने मागितली माफी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी ज्या मालिकेत भूमिका करत होते, ती बंद झाली होती. अशा परिस्थितीत दिलीप यांच्याकडे जवळपास वर्षभर काम नव्हतं. मात्र त्याचदरम्यान 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असितकुमार मोदी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. या कॉमेडी टीव्ही मालिकेत चंपकलाल आणि जेठालाल यांपैकी एकाची निवड करण्याची ऑफर त्यांना दिली. तेव्हा दिलीप जोशी यांनी 'चंपकलाल'ऐवजी 'जेठालाल' हे पात्र निवडणं पसंत केलं. मात्र असितकुमार मोदींना दिलीप यांनी 'चंपकलाल'ची व्यक्तिरेखा साकारावी, असं वाटत होतं.

'चला हवा येऊ द्या' चे वऱ्हाड निघालं अमेरिकेला ; लवकरच सुरू होणार नवं पर्व

त्या वेळी दिलीप जोशी यांनी असितकुमार मोदींना आत्मविश्वास दिला, की ते 'जेठालाल'च्या पात्रासाठी अधिक योग्य आहेत. त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. दिलीप जोशी यांना एके काळी अभिनय जगताचा निरोप घ्यायचा होता, मात्र आता ते टीव्ही इंडस्ट्रीतले सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून 'जेठालाल' अर्थात दिलीप जोशी आज घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेच्या आधी जवळपास एक वर्ष त्यांच्याकडे कोणतंही काम नव्हतं. तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
First published:

Tags: Tarak mehta ka ooltah chashmah

पुढील बातम्या