मुंबई, 10 मे: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये बबितची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) एका VIDEO मुळे चांगलीच अडचणीत आली आहे. तिने तिच्या एका (Munmun Dutta VIDEO) व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरल्याने चांगलाच वाद ओढवला. चूक लक्षात आल्यानंतर आता या अभिनेत्रीने माफी मागितली आहे.
टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधली बबिता म्हणून मुनमुन दत्ता (Munmun Dutta) प्रसिद्ध आहे. तिने तिच्या एका ताज्या VIDEO त दलित समूदायाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला. तिच्या या सोशल मीडियावरच्या व्हिडीओनंतर अनेक जणांनी यावर आक्षेप घेतला. निषेध नोंदवला.
आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर अभिनेत्रीने तिचा तो वादग्रस्त व्हिडीओ instagram वरून डिलीट केला आहे. जातीवाचक उल्लेख केल्याबद्दल तिने (Munmun Dutta Apologies) माफी मागितली आहे. सोशल मीडियावर #ArrestMunmunDutta हा टॅग ट्रेंड करत होता. हरिजनांचा उल्लेख जातीवाचक केल्याने तिच्यावर ही वेळ ओढवली.
अगं बाई.. अरेच्चा! केदार शिंदे लग्नानंतर 25 वर्षांनी पुन्हा अडकले विवाह बंधनात
या व्हिडीओबद्दल माफी मागताना मुनमुनने म्हटलं आहे की, "मी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओसंदर्भात ही पोस्ट आहे. माझ्याकडून वापरल्या गेलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला. हा कुणाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, कुणाला धमकी किंवा कुठल्याही पद्धतीने भावना दुखावण्याच्या उद्देशाने मी तसं बोलले नाही. माझ्या संकुचित भाषाज्ञानामुळे मला त्या शब्दाचा अर्थ नेमका माहीत नव्हता किंवा भाषेबद्दल चुकीच्या माहितीवर तसं बोललं गेलं. मला त्याचा नेमका अर्थ लक्षात आल्यानंतर मी लगेच तो भाग काढून टाकला."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.