Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या चाहत्यांना मोठा धक्का, 12 वर्षांनी अंजली भाभीने सोडला शो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या चाहत्यांना मोठा धक्का, 12 वर्षांनी अंजली भाभीने सोडला शो

सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'भाभीजी घर पर है (Bhabhiji Ghar Par Hain)' नंतर आता 'तारक मेहता का उल्टा चश्मा... (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'भाभीजी घर पर है (Bhabhiji Ghar Par Hain)' नंतर आता 'तारक मेहता का उल्टा चश्मा... (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या कार्यक्रमात 12 वर्ष तारक मेहताची पत्नी अंजली मेहताची भूमिका करणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिकेला अलविदा केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये यामध्ये चर्चा सुरू होती. नेहा लवकरच या मालिकेमध्ये काम करताना दिसणार नाही आहे, यामुळे 'तारक मेहता...'च्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

SpotboyE.com ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्ष 'अंजली भाभी'च्या रुपात चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या नेहा मेहताने या कार्यक्रमाला अलविदा केले आहे. म्हणजेच नेहा आता या मालिकेचा घटक नसणार आहे. नेहाने मालिकेच्या निर्मात्यांना याबाबत सूचना दिली असून तिने सेटवर रिपोर्ट करणे देखील बंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालिके्या निर्मात्यांनी नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम आहे.

(हे वाचा-SSR Death : CBI अ‍ॅक्शनमध्ये!रिया चक्रवर्तीला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी बोलावणार)

अशी बातमी समोर येत आहे की, नेहाला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. ज्यामुळे तिने 12 वर्ष ज्या मालिकेचा ती अविभाज्य घटक होती, त्या मालिकेला अलविदा केले आहे. गेल्या महिन्यात 28 जुलै रोजी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाली होती. नेहा मेहता सुरुवातीपासून या मालिकेमध्ये आहे. दरम्यान आता नेहाची जागा कोण घेणार याबाबत कोणती माहिती समोर आली नाही आहे.

(हे वाचा-हिंदूस्तानी भाऊला Instagram चा दणका! युजर्सच्या तक्रारीनंतर अकाउंट केलं निलंबित)

'तारक मेहता...'या मालिकेतील अंजली हा अनेकांचा आवडीचा चेहरा होता. मिळालेल्या माहितीनुसार नेहा या मालिकेच्या शूटिंगसाठी एका दिवसाचे 25 हजार रुपये मानधन घ्यायची. ती उत्तम डान्सर देखील आहे. नेहाने अशाप्रकारे शो सोडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 21, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या