मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तारक मेहता...' फेम बबिताजी मुनमुन दत्ता 9 वर्षांनी लहान असणाऱ्या टप्पूला करतेय डेट

'तारक मेहता...' फेम बबिताजी मुनमुन दत्ता 9 वर्षांनी लहान असणाऱ्या टप्पूला करतेय डेट

मुनमुन दत्ता मालिकेत टप्पू हे पात्र साकारणाऱ्या राज अनादकतला (Raj Anadkat) डेट करतेय. विशेष म्हणजे या दोघांच्या आयुष्यात 9 वर्षांचं अंतर आहे त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत असणाऱ्या या मालिकेतील सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. हे सर्व कलाकार सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील कलाकारांची एक प्रेमकथा (Love Story) आता सर्वांसमोर आली आहे. या मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) मालिकेतीलच एका कलाकाराला डेट करत आहे.

    मुनमुन दत्ता मालिकेत टप्पू हे पात्र साकारणाऱ्या राज अनादकतला (Raj Anadkat) डेट करतेय. विशेष म्हणजे या दोघांच्या आयुष्यात 9 वर्षांचं अंतर आहे त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    ‘तारक मेहता का उल्टा चश्मा ’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्या खासगी आयुष्याशी (personal life ) संबंधित ही बाब समोर आली आहे. मुनमुन दत्ता तिच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आहे. मालिकेतील तिचा सह-कलाकार टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकतला ती सध्या डेट करतेय. टप्पू या मालिकेतील मुख्य पात्र असणाऱ्या जेठालाल गडाचा मुलगा आहे.

    ‘नो एन्ट्री’ फेम ही बॉलिवूड अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नेंट

    मुनमुनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटो आणि व्हिडीओवर राजच्या कमेंट्स पाहून त्यांच्या नात्याची खास चर्चा होती. आता तर या दोघांमधलं हे नातं स्पष्ट झालं आहे.

    भारती सिंगच नाही तर 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही घटवलं प्रचंड वजन, पाहा कोण आहे

    विशेष म्हणजे मुनमुन आणि राज यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे. राज 24 वर्षांचा आणि मुनमुन 33 वर्षांची आहे. तरीही हे दोघं प्रेमात आहेत. दोघांच्या कुटुंबियांना या नात्याची जाणीव आहे. दोघंही अविवाहित आहेत. दोघांनीही आपल्या कुटुंबाला याबाबत सांगितलं आहे. त्याचबरोबर ' तारक मेहता का उल्टा चश्मा ' मालिकेच्या टीमलाही या दोघांच्या नात्याबद्दल माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बराच काळ डेट करत आहेत. तरीही ही गोष्ट लोकांसमोर उघड झाली नव्हती. कुटुंबाव्यतिरिक्त 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीम दोघांच्या नात्याकडे आदराने पाहते. प्रत्येक जण त्यांच्या नात्याचा आदर करतो. दोघेही सेटवर उघडपणे एकमेकांसोबत वेळ घालवतात. मुनमुन दत्ता अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करत आहे. तर राजनं 2017 मध्ये या मालिकेत एन्ट्री केली आहे.

    First published:

    Tags: Tarak mehta ka ooltah chashmah