Home /News /entertainment /

तारक मेहता का उल्टा चष्मा : दया बेनसोबत जेठालालचा रोमँटिक डान्स, थ्रोबॅक video viral

तारक मेहता का उल्टा चष्मा : दया बेनसोबत जेठालालचा रोमँटिक डान्स, थ्रोबॅक video viral

तारक मेहता का उल्टा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमांपैकी एक आहे. यामध्ये दया बेन आणि जेठालालची(Jethalal) भूमिका दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि दिशा वाकानी (Disha Vakani) यांनी साकारली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 2 जानेवारी - तारक मेहता का उल्टा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमांपैकी एक आहे. यामध्ये दया बेन आणि जेठालालची(Jethalal) भूमिका दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि दिशा वाकानी (Disha Vakani) यांनी साकारली आहे. दोघेही इतक्या वर्षांपासून या शोशी जोडले गेले आहेत की आता ते लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतात. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री, टायमिंग आणि एक्स्प्रेशन लोकांना खूपच आवडते. प्रेक्षकांची ही आवडती जोडी आहे. आता या दोघांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील त्यांचा हा व्हिडिओ भलताच आवडला आहे. दिशा वाकानी बर्‍याच दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिसत नाही. मात्र त्यांचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.या शोच्या सुरुवातीच्या दिवसातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिशा वाकानी आणि दिलीप जोशी रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.त्यांचा डान्स नेटकऱ्यांना देखील आवडलेला आहे. वाचा-किचन कल्लाकार'मध्ये शिजणार राजकीय खिचडी, नेते मंडळी लावणार हजेरी तारक मेहतामधील या पॉवर कपलने येस बॉस या 90 च्या दशकातील हिट चित्रपटातील ‘एक दिन आप हम ऐसे मिल जाएंगे’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही डान्सचा सराव करताना दिसत आहेत.चाहत्यांना त्यांच्या आवडत्या जोडीला नाचताना पाहून आनंद झाला आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून शोचे जुने दिवस आठवले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिशा वाकानी आणि दिलीप जोशी यांचे चाहते खूपच खूश आहेत. चाहते कमेंट्स करत पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्याची इच्छाही व्यक्त करत आहेत.
  दिशा वाकानी बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसत आहे. आता काही दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की, दिलीप जोशी देखील लवकरच शोला अलविदा करणार आहेत. दिलीप जोशी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली होती. मला वाटते हा शो चांगला चालत आहे मग उगाचच हा शो का सोडयाचा अशी प्रतिक्रिया दिली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress, TV serials

  पुढील बातम्या