मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Taarak Mehta...फेम पोपटलालने हॉलिवूड चित्रपटात केलंय काम;विश्वास बसत नसेल तर, पाहा VIDEO

Taarak Mehta...फेम पोपटलालने हॉलिवूड चित्रपटात केलंय काम;विश्वास बसत नसेल तर, पाहा VIDEO

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राची स्वतःची अशी वेगळी फॅन फॉलोइंग आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 सप्टेंबर-  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राची स्वतःची अशी वेगळी फॅन फॉलोइंग आहे. गेल्या काही दिवसांत अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामध्ये पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकही प्रेक्षकांना प्रचंड पसंत आहे. या मालिकेमुळे श्यामला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये पोपटलाल साकारणारा श्याम पाठक हा एक अनुभवी अभिनेता आहे. ज्यांना प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये लहान-लहान भूमिका साकारताना पाहिलं आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल की, श्याम यांनी हॉलीवूड चित्रपटामध्येही काम केलं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये अनुपम खेरसोबत श्याम पाठक दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता श्याम पाठक यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून अफाट लोकप्रियता मिळाली आहे. पण याशिवाय त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हा व्हिडिओ हॉलिवूड चित्रपटाची छोटीशी क्लिप आहे. ज्याचं नाव आहे - 'लस्ट कॉशन' जो एक चीनी चित्रपट आहे. हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता.हा व्हिडीओ स्वतः श्याम पाठक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

(हे वाचा:Taarak Mehta Ka Ooltah Chashma : ठरलं! दयाबेन मालिकेत परतणार; निर्मात्यांनी स्वतः केलं उघड )

या व्हिडीओमध्ये श्याम पाठक अतिशय गंभीर अभिनय करतांना दिसून येत आहेत. ही भूमिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'पेक्षा अतिशय वेगळी आहे. या व्हिडीओमुळे श्याम पाठक एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी श्याम पाठक यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Hollywood, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actor