मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Taarak Mehta...फेम बबिताच्या रिअल लाईफमध्येही आहेत 'जेठालाल'; अभिनेत्री असं करते हॅन्डल

Taarak Mehta...फेम बबिताच्या रिअल लाईफमध्येही आहेत 'जेठालाल'; अभिनेत्री असं करते हॅन्डल

मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ता

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. गेल्या चौदा वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 सप्टेंबर-   'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. गेल्या चौदा वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. शोमधील प्रत्येक कलाकाराने आपली एक खास ओळख बनवली आहे. यातील एक पात्र म्हणजे बबिता हे होय. ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ताने साकारली आहे. शोमधील मुनमुनची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. शोमध्ये जेठालाल आणि बबिता यांच्या मजेशीर केमिस्ट्रीने सर्वांनाच पोट धरुन हसायाला भाग पाडलं आहे.

'बबिता' या भूमिकेमुळे मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरसुद्धा तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अभिनेत्री मजेशीर रील्स आणि अप्रतिम डान्स व्हिडीओदेखील शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिच्या प्रत्येक पोस्ट पसंत पडतात. मुनमुनच्या चाहत्यांना तिच्याबाबत छोट्या-छोट्या अपडेट जाणून घ्यायला आवडतं. आज आपण तिच्याबाबत अशीच एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये जेठालाल आणि बबिता यांची केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे. लग्न होऊनसुद्धा जेठालाल बबितावर फिदा आहेत. बबीताला खुश करण्यासाठी जेठालाल अनेक अतरंगी प्रयत्न करत असतात. त्यातून अनेक मजेशीर किस्से घडतात. मात्र शोमध्ये बबिता नेहमीच जेठालाल मजेशीर उत्तर देऊन वेळ मारुन नेते. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मुनमुनच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा काही जेठालाल आहेत. त्यांना कसं हॅन्डल करायचं हे मुनमुनला चांगलं माहितेय.

एका मुलाखतीदरम्यान मुनमुन दत्ताने खुलासा करत आपल्या रिअल लाईफमधील जेठालालबाबत सांगितलं होतं. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिचे काही मित्र तिच्यासोबत फ्लर्ट करतात यामध्ये काही विवाहित मित्र आहेत. जे लग्न होऊनसुद्धा तिच्यासोबत फ्लर्ट करतात जसं की मालिकेत जेठालाल करतात. मुनमुनने मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या विवाहित मित्रांना तिच्यावर क्रश आहे. ते तिला पसंत करत. आणि त्यांनी अनेकवेळा हे मुनमुनला सांगितलंदेखील आहे.

View this post on Instagram

A post shared by ‍♀️ (@mmoonstar)

(हे वाचा:Shehnaaz Gill ने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन, रोमॅन्टिक गाणं ऐकून चाहते म्हणाले... )

मुनमुने पुढे सांगितलं फ्लर्ट हे एका मर्यादेपर्यंत ठीक असतं. त्याचा अतिरेक होता कामा नये. आणि माझे हे मित्र मर्यादेत असतात. त्यांच्याकडून मला कोणतंही नुकसान नाहीये. ते मनमोकळेपणाने माझं कौतुक करतात. आणि तू आमची क्रश असल्याचं सांगतात. त्यामुळे मी ऐकते आणि हा ठीक आहे इतकं म्हणून सोडून देते. कामाबाबत सांगायचं तर मुनमुनने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने 'हम सब बाराती' या मालिकेतून अभनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र तिला खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे मिळाली आहे.

First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actress