Home /News /entertainment /

'तारक मेहता..'सोडणार असल्याच्या चर्चेदरम्यान शैलेश लोढा यांची चकित करणारी पोस्ट VIRAL

'तारक मेहता..'सोडणार असल्याच्या चर्चेदरम्यान शैलेश लोढा यांची चकित करणारी पोस्ट VIRAL

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे.मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. परंतु यातील अनेक कलाकारांनी विविध कारणांसाठी मालिका सोडली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या शोममधील 'तारक मेहता' ही महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढासुद्धा (Shailesh Lodha) ही मालिका सोडत असल्याची चर्चा सुरु आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई,18  मे-   ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे.मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. परंतु यातील अनेक कलाकारांनी विविध कारणांसाठी मालिका सोडली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या शोममधील 'तारक मेहता' ही महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढासुद्धा   (Shailesh Lodha)  ही मालिका सोडत असल्याची चर्चा सुरु आहे. या वृत्तामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शैलेश यांनी अजूनही याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाहीय. परंतु त्यांच्या एका पोस्टने सर्वानांच संभ्रमात टाकलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सब वाहिनीवरील या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. गेली 14 वर्षे ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते शैलेश लोढा होय. या मालिकेत त्यांनी तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारली आहे. मालिकेतील जेठालाल या मुख्य पात्राला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रत्येक अडचणीतून सोडवण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली पाहायला मिळते.शैलेश यांनी हे पात्र फारच उत्तम रंगवलं आहे.त्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.परंतु शैलेश हा शो सोडत असल्याच्या बातमीने सर्वानांच निराश केलं आहे.
  दरम्यान शोधलं मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या शैलेश यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. शैलेश यांनी शो सोडण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी या पोस्टमुळे सर्वच संभ्रमात पडले आहेत. त्यांनी आपला एक फोटो शेअर करत एक शायरी लिहिली आहे, ''हबीब सोज़ साहब का एक शेर कमाल का है, "यहाँ मज़बूत से मज़बूत लोहा टूट जाता है,कई झूठे इकठ्ठे हों, तो सच्चा टूट जाता है'', या पोस्टमुळे सर्वच चकित झाले आहेत.खरंच शैलेश यांचं शो मेकर्सशी काही बिनसलं आहे का? की टीमसोबत काही बिनसलं आहे? असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actor

  पुढील बातम्या